Get Mystery Box with random crypto!

जो जेरोनिमो बुरुज काबीज करून मराठे साष्टीत घुसले त्याचे नामकरण | " छञपती श्री शिवाजी महाराज "

जो जेरोनिमो बुरुज काबीज करून मराठे साष्टीत घुसले त्याचे नामकरण ‘फत्तेबुरुज’ करण्यात आले. अपुरा दारुगोळा आणि शिबंदी यामुळे पोर्तुगीज आपल्या कुटुंबकबिल्यासह गलबतातून वसई आणि उरणकडे पळून गेले. २९ मार्च १७३७ ला ठाण्याच्या किल्ल्यावर मराठ्यांचा जरीपटका डौलाने फडकला. पोर्तुगीज साष्टीतून कायमचे हद्दपार झाले.



२९ मार्च इ.स.१७५५
इंग्रजांच्या मदतीने पेशव्यांनी आंग्रेंचा सुवर्णदुर्ग घेतला
तुळाजी आणि पेशव्यांचे आधीच वैर असल्याने तुळाजी पेशव्यांचे आदेश मानेनासा झाला,सरकारात ऐवज भरण्यास मनाई करू लागला आणि स्वतंत्र कारभार करू लागला.सुवर्णदुर्ग ते दक्षिण कोकण वर वर्चस्व,प्रबळ आरमार आणि पराक्रमी असल्याने पेशव्यांना नुसत्या फौजेनिशी त्याचा पराभव करणे शक्य नव्हते. त्यामुळे पेशव्यांनी तुळाजी विरुध्द युद्धासाठी इंग्रजांची मदत मागितली,इस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांकडून वारंवार खंडणी घेतल्याने इंग्रज तुळाजीचा काटा काढण्याची संधीच शोधत होते.इंग्रज आणि पेशवे यांच्यादरम्यान १९ मार्च १७५५ रोजी हा दुर्दैवी करार झाला.
इंग्रजांनी या मोहिमेची कामगिरी कप्तान विलियम जेम्स यांच्याकडे सोपवली.इस्ट इंडिया कंपनीची ४१ लढाऊ गलबते मुंबईहून सुवर्णदुर्गकडे निघाली त्यांना पुढे पेशव्यांची ६० गलबते,७ तारवे आणि १ बातेला येऊन मिळाले.अश्या प्रकारे हे संयुक्त आरमार २९ मार्च १७५५ ला सुवर्णदुर्ग ला येऊन थडकले.२ एप्रिल १७५५ रोजी इंग्रजांनी कप्तान विलियम जेम्स याच्या नेतृत्वाखाली सुवर्णदुर्ग जिंकून पेशव्यांच्या हवाली केला.



२९ मार्च इ.स.१८५७
क्रांतिकारक मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या व इथूनच १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाला खरी सुरुवात झाली.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.