Get Mystery Box with random crypto!

आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष २९ मार्च इ.स.१६५७ (चै | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

२९ मार्च इ.स.१६५७
(चैत्र वद्य दशमी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार रविवार)

औरंगजेब अडकला!
विजापुर काबीज करून दिल्लीचे तख्त मिळवायचे व नंतर सम्राट म्हणून मिरवायचे असे मनी धरून, औरंगजेबाने बिदर कल्याणी हा भाग जिंकला. पण याच अतिउत्साहात औरंगजेब एका मोक्याच्या क्षणी अफजलखानाच्या हातात सापडला. अफजलखान विजापुरच्या बादशहाशी एकनिष्ठ होता. त्यामुळे त्याने औरंगजेबास ठार मारायचे ठरविले व विजापुरवरील संकट कायमचे दूर करावयाचे असे मनोमन ठरविले. बिदरचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात आला. मात्र याच प्रयत्नात औरंगजेब अफजलखानाच्या तावडीत सापडून जिवावरच्या संकटावर सापडला होता.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link





२९ मार्च इ.स.१६६७
सिंधुदुर्ग आज रोजी बांधून पूर्णत्वास आला, म्हणून महाराजांनी गडावर मोठी पूजा घातली.
मालवणच्या समुद्रात असलेल्या ‘‘कुरटे‘‘ बेटावर शुध्द खडक, मोक्याची जागा व गोड्यापाण्याची सोय ह्या गोष्टी पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञा केली;" या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा चौर्‍यांशी बंदरी ऐशी जागा नाही"! आणि ‘‘सिंधुदुर्ग‘‘ नावाची शिवलंका साकार झाली. सिंधुदुर्गच्या उभारणीने मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. इंग्रज, पोर्तुगीज, चाचे यांना वचक बसला. ‘‘चौर्‍याऎंशी बंदरात हा जंजिरा, अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला. सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मानी तारा जैसे मंदिराचे मंडन, श्रीतुलसी वृंदावन राज्यास भूषणप्रद अलंकार चतुर्दश महारत्नांपैकीच पंधरावे रत्न महाराजांस प्राप्त झाले‘‘ हा चित्रगुप्ताच्या बखरीतील मजकूर सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्व सांगून जातो.

मालवण किनार्‍यावरील मोरयाचा धोंडा ह्या गणेश, चंद्रसूर्य, शिवलिंग कोरलेल्या खडकांची पूजा करुन व समुद्राला सुवर्ण श्रीफळ अर्पण करुन महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहुर्ताचा चिरा बसवला. किल्ला बांधण्यासाठी ५०० पाथरवट, २०० लोहार, १०० गोवेकर पोर्तुगिज व ३००० मजूर ३ वर्षे अहोरात्र खपत होते. सागरी लाटांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी व किल्ल्याचा पाया भक्कम करण्यासाठी उकळते शिसे ओतून त्यावर मोठे मोठे चिरे बसवण्यात आले. तसेच घाटावरुन मागवलेला चुना वापरुन किल्ल्याचे इतर बांधकाम करण्यात आले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले. त्याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज स्वत: हजर होते. किल्ले बांधणीच्या ३ वर्षाच्या काळात महाराजांनी लिहीलेली किल्ले बांधणी संबंधी मार्गदर्शन करणारी पत्र उपलब्ध आहेत.



२९ मार्च इ.स.१६७०
२९ मार्चला मुंबईकर इंग्रजांनी त्यांच्या सुरतेच्या वरिष्ठाना अजून एक पत्रं लिहिलं त्या पत्रात ते म्हणत आहेत. मुंबई - सुरत
'शिवाजीला कोणाचाही विरोध न होता तो एकसारखा जिंकत चालला आहे. त्याने मोगलांपासून पुरंदर किल्ला घेतल्याची आज बातमी आली. कर्नाळा देखील फार दिवस टिकाव धरणार नाही.'



२९ मार्च इ.स.१६८५
विजापुरचे किल्ल्याला वेढा पडला.
रसलपुरच्या बाजूने (पश्चिमेकडून) बहादुरखान, शहापुरचे बाजूने राहुल्लाखान बक्षी, नागठाण विजापुरपासूनचे ८ मैलांवरील (सु.१३ कि.मी. वरील) ठिकाणी बहादुरखानाचा तळ पडला. लढाईची सर्व सुत्रे शहजादा आज्जमच्या हातात होती. मोगली वकील खाज्या अब्दुल रहीम याच्याशी लढाई सुरू झाली. त्याच्या मदतीस बहादरखानाचा मुलगा दौलतमुरा व राजमहंमद याचे तक्त्यात येऊन किल्ल्यावर हल्ला करून परत गेला.





२९ मार्च इ.स.१७३७
मराठ्यांचा जरीपटका साष्टीवर डौलाने फडकला
मराठे पोर्तुगीजांना साष्टीतून हद्दपार करण्यासाठी वसई मोहिमेवर निघाले. मराठ्यांची फौज साष्टी किल्ल्यावर आणण्याचे महत्त्वाचे काम गंगाजी बंधू बुबाजी नाईक यांनी पार पाडले. चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखालील मराठी सैन्य राजमाची, प्रबळगड, खिडकाळी, शिळ मार्गे कळव्यात आले. लढणारी तुकडी साष्टीकडे (ठाण्याकडे) रवाना झाली. २६ मार्च १७३७ ला कळव्याकडून आलेल्या या तुकडीने जेरोनिमो हा पाणबुरूज काबीज केला. इशारतीच्या तोफा होताच बदलापूर मुक्कामी असलेले चिमाजी आप्पा सैन्यासह कळव्यात आले. आप्पासाहेबांनी स्वतःच्या हातांनी चिखलावर पेंढा पसरवून मराठी सैनिकांना प्रोत्साहन दिले. रातोरात मराठी सैन्य कळव्याची खाडी ओलांडून साष्टीत (ठाण्यात) शिरले. २७ व २८ मार्च रोजी चिमाजी आप्पांनी साष्टीतील सर्व चौक्या पहाऱ्यांचा बंदोबस्त केला.