Get Mystery Box with random crypto!

२७ मार्च इ.स.१७८५ आग्रा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात! | " छञपती श्री शिवाजी महाराज "

२७ मार्च इ.स.१७८५
आग्रा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात!
बादशहाचे फर्मान घेऊन रायाजी पाटील हा आग्रा येथे पोहोचला. त्याची नेमणूक आग्रा येथे किल्लेदार म्हणून झाली होती. परंतु आग्रा येथील किल्लेदार शुजादिलखान याने किल्ला लढविण्याची तयारी केली. रायाजीने शहर, गज, मंडी येथे बंदोबस्त केला तो किल्ल्याला मोर्चे लावण्यासाठी आला. त्याने खंदक खणण्यास प्रारंभ केला. तेथून त्याने आग्रा किल्ल्यावर तोफांची सरबत्ती सुरू केली. त्या भडिमाराने किल्ल्याची तटबंदी फुटू लागली. बादशहाला घेऊन महादजी शिंदे येताच किल्ल्याचा वेढा आवळण्यात आला. शुजादिलला आता दुसरा मार्गच उरला नव्हता. हाताखालचे सगळेच जाण्यापेक्षा काहीतरी हाताशी ठेवावे, या इराद्याने त्याने महादजी शिंदे यांच्याशी बोलणी सुरू केली. वार्षिक ५२ हजार रुपये उत्पन्नाची जहागीर घेऊन त्याने २७ मार्च इ.स.१७८५ रोजी आग्रा किल्ला मराठी फौजेला देऊन टाकला. मोगली साम्राज्याच्या दुसऱ्या शहरावर मराठी ध्वज फडफडू लागला. याच किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशहा औरंगजेबासमोर सिंहगर्जना केली होती. जोधपुरचा राजा जसवंतसिंह याचा जामरूद येथे म्रृत्यू झाल्यावर आग्रा किल्ल्याच्या आत असलेला त्याचा मुलगा अजितसिंह याला घेऊन दुर्गादास राठोड आणि त्याच्या मारवाडच्या वीरांनी तलवार बाजी करून तेथूनच त्याला बाहेर नेले होते. त्या आग्रा येथील दुर्गावर मराठी निशाण फडकत होते. ते फडकताना पाहून मराठी विरांचे उर निश्चित भरून आले असतील.





YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.