Get Mystery Box with random crypto!

आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष २७ मार्च इ.स.१६६६ औरंगजेब | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष

२७ मार्च इ.स.१६६६
औरंगजेबाचे राज्यरोहन
१६६६ हे वर्ष औरंगजेबाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते. यापूर्वीच बादशहा औरंगजेब स्वतःला मुघल सम्राट म्हणून सारे बादशाही सोपस्कार केले होते पण बादशाह शहाजहान जिवंत असल्यामुळे लोकांच्या दृष्टीने औरंगजेबाची ही बंडखोरीच होती. आता बादशाह शहाजहानच्या मृत्यूमुळे सिंहासनावर बसण्याची व शाही सोपस्कार करवून घेण्याचा नैतिक अधिकार औरंगजेबाला प्राप्त झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा दि. २७ मार्च १६६६ ला आग्रा येथे बादशहाचा राज्यारोहण केला. शिवराय त्यावेळी प्रवासातच होते. राज्यरोहणाच्या वेळी औरंगजेबाने आपल्या बहिणींना पुष्कळ संपत्ती दिली.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




२७ मार्च इ.स.१६६७
मिर्झाराजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना २४ ऑक्टोबर १६६६ रोजी अटक केली होती. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. आजच्या दिवशी नेताजी पालकरांचे औरंगजेबाकडून धर्मांतर झाले. नेताजी पालकरांचे ‘मुहंमद कुलीखान’ असे नामकरण करण्यात आले.
जून १६६७ ला औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी पालकर यांना काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना करण्यात आले, लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली. बाटून ९ वर्षे उलटल्यानंतर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. त्याने या 'मुहंम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले. मे १६७६ रोजी पश्चाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले. १९ जून १६७६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.



२७ मार्च इ.स.१६८९
छत्रपती शंभूराजेंच्या मृत्यूनंतर मातबरखान कोकणात (कल्याण जवळ) उतरला. तो माऊलीहून २७ मार्च १६८९ रोजी कल्याणला आला. नंतर त्याने कल्याणकडील दुर्गाडी किल्ल्याला वेढा घातला. अगदी अल्प काळातच ह्या किल्ल्याचा शासन कारभार सुरळीतपणे चालवण्याचे त्याने औरंगजेबास आश्वासन दिले. माहुलीगड म्हणजे तळकोकणचे प्रमुख ठाणे असल्याचे त्याने औरंगजेबाला कळवले. परंतु त्याच्या परिसरात मोगल साम्राज्याची कोठेही ठाणी नव्हती. किल्ल्यात दाणागोट्याचा साठा मुबलक होता आणि किल्ला अत्यंत बळकट होता. दुर्गाडीच्या किल्ल्याला वेढा घालण्याच्या दृष्टीने त्या किल्ल्याच्या सभोवतालच्या परिसरात मोगलांची सुसज्ज अशी लष्करी ठाणी बसवणे महत्त्वाचे होते. तेव्हा मातबरखानाने फितुरीच्या तंत्राने माहुली सर करण्याचे ठरविले. त्याने गडावरील किल्लेदाराशी संधान बांधले. द्वारकाजी (किल्लेदार) आणि त्यांच्या सैन्याच्या तुकडीतील काही सैनिकांनी बादशहाची चाकरी स्वीकारावी असे आवाहन मातबरने आग्रहपूर्वक केले. मोगलांना जे सामील होतील त्यांना मनसब देण्याचे, बक्षीस आणि इतरही शाही मानमरातब देण्याचे आश्वासन खानाने दिले. मोगल औरंगजेबकडून त्यांना सनदा दिल्यावर द्वारकाजी व त्याच्या अनुयायांनी माहुली आणि त्याच्या परिसरातील महेंद्रगड, पासलगड वगैरे किल्ले मोगलांच्या स्वाधीन करण्याचे मान्य केले. मातब्बरखानाने माहुलीगडाच्या किल्लेदाराला २५०० सुवर्ण मोहरा दिल्या आणि किल्ल्याचा ताबा घेतला. मातब्बरखानाने कल्याण काबीज केले.





२७ मार्च इ.स.१७३७
चिमाजीअप्पांनी ठाणे जिंकले.
२६ मार्च १७३७ ला कळव्याकडून आलेल्या तुकडीने जेरोनिमो हा पाणबुरूज काबीज केला. इशारतीच्या तोफा होताच बदलापूर मुक्कामी असलेले चिमाजी आप्पा सैन्यासह कळव्यात आले. आप्पासाहेबांनी स्वतःच्या हातांनी चिखलावर पेंढा पसरवून मराठी सैनिकांना प्रोत्साहन दिले. रातोरात मराठी सैन्य कळव्याची खाडी ओलांडून साष्टीत (ठाण्यात) शिरले. २७ व २८ मार्च रोजी चिमाजी आप्पांनी साष्टीतील सर्व चौक्या पहाऱ्यांचा बंदोबस्त केला. जो जेरोनिमो बुरुज काबीज करून मराठे साष्टीत घुसले त्याचे नामकरण ‘फत्तेबुरुज’ करण्यात आले.



२७ मार्च इ.स‌.१७६७
मालेराव होळकरांचा मृत्यू
मल्हाररावांचे एकुलते एक पुत्र खंडेराव कुंभेरीच्या १७५४ च्या वेढ्यात त्यांस तोफेचा गोळा लागला व त्यांत त्यांचे निधन झाले (१७ मार्च १७५४).
त्यांच्या मृत्यूनंतर मल्हाररावांनी खंडेरावांचा मुलगा मालेराव यांस इंदूरच्या गादीवर बसविले. मालेराव राज्यप्राप्तीनंतर दहा महिन्यांत २७ मार्च १७६७ रोजी मरण पावले.