Get Mystery Box with random crypto!

ऑलिम्पिक साठी खेळाडू 4 वर्षातून एकदा होणाऱ्या स्पर्धेसाठी मेह | 🚫 **Civil Zilha Parishad** 📶♻

ऑलिम्पिक साठी खेळाडू 4 वर्षातून एकदा होणाऱ्या स्पर्धेसाठी मेहनत करीत असतात.

कोरोना मुळे स्पर्धा पुढें ढकलण्यात आली. अनेक खेळाडू यांची तयारी पूर्ण झाली होती ते आतुरतेने स्पर्धा कधी होणार यांची वाट पाहत होते.
अनेक वर्षांपासून त्यानी अनेक गोष्टीचा त्याग गेला होता. मनावर नियंत्रण ठेवले होते. एकदा का स्पर्धा संपली के त्याना त्याग केलेल्या गोष्टी , मुक्तपणे खाणे पिणे करायचे होते.
तसेच स्पर्धा होत परत सतत सराव ठेवणे सुध्दा सर्व खेळाडू यांना आवश्यक होते.

एकदाची स्पर्धा झाली. ज्यांनी संयम ठेवला त्याना यश प्राप्त झाले.

स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे उमेदवार यांची सुद्धा अशीच परिस्थिती झाली आहे.
कोरोना मूळे स्पर्धा परीक्षेला खीळ बसली होती.
आता स्पर्धा परीक्षेची गाडी रुळावर येत आहे.
ज्यांनी या काळात संयम ठेवत अभ्यास केला त्याना आता यश नक्कीच मिळेल.

तेव्हा ऑलिम्पिक पासून खूप काही शिकण्याजोगे आहे.

आजच्या तरुण पिढी मध्ये संयम कमी होत चालला आहे. कोणतीही गोष्ट इन्स्टंट हवी असते.
परंतु प्रत्येक गोष्टी इन्स्टंट होत नसतात.
मानवाच्या जन्माला सुद्धा 9 महिने लागतात.

तेव्हा इन्स्टंट च्या नादात पॅनिक होऊ नका.

लोकसेवा आयोग ,सरकार याच्या मागील आव्हान समजा. जाणूनबुजून चालू भर्ती प्रक्रिया मध्ये उशीर होत नसून एक एक नवीन गोष्टी येत आहे. त्यामुळे भर्ती प्रक्रिया ला उशीर होत आहे.
अनेक उमेदवार याचे ई-मेल , msg येत आहे.

"Frustrated झालो , डिप्रेशनमध्ये जात आहो , जीवन संपवून टाकावे अश्या प्रकारचे विचार येत"
कृपया असे टोकाचे विचार करू नका.
थोडा धीर धरा. मानसोपचार तज्ञ याना भेटा . समुपदेशन करून घ्या.

आणि नौकरी करणे आवश्यक झाले आहे , पैशाची गरज आहे , घरी हातभार लावणे आवश्यक आहे अशी वेळ आली असेल खाजगी क्षेत्रात नौकरी पहा, मिळेल ते काम करा.आणि सोबत आपले स्वप्नं पूर्ण कारणासाठी अभ्यास करीत रहा.
@civinfo