Get Mystery Box with random crypto!

इतिहास 124(अ) चा : भारतीय दंड विधानातील प्रकरण 6 चे शीर्षक ‘ | PSI ( पोलीस उपनिरीक्षक)

इतिहास 124(अ) चा :

भारतीय दंड विधानातील प्रकरण 6 चे शीर्षक ‘देशविरोधी गुन्हे’ असे आहे आणि त्यात 121-130 या कलमांचा समावेश आहे, ज्यांत भारत सरकारविरोधात युद्ध पुकारणे आणि अशा प्रकारचे युद्ध पुकारण्यासाठी शस्त्रांची जमवाजमव करणे यासारख्या गंभीर गुन्ह्य़ांचा समावेश आहे.

उल्लेखनीय म्हणजे मेकॉलेने 1837-39 या कालावधीत जेव्हा दंड विधानाचा मसुदा तयार केला त्या वेळी 124(अ) हे कलम 113 होते. परंतु दंड विधान 1860 मध्ये जेव्हा अमलात आले त्या वेळी हे कलम गाळून टाकण्यात आले होते. आणि त्या संदर्भात कुठे वाच्यताही करण्यात आली नाही. सर जेम्स स्टिफन यांनी 1870 मध्ये दुरुस्ती करून कलम 124(अ) चा समावेश भारतीय दंड विधानात केला.

1897 मध्ये ब्रिटनची महाराणी विरुद्ध बाळ गंगाधर टिळक या बहुचíचत खटल्यादरम्यान कलम 124(अ) त्याच्या मूळ रूपात सादर करण्यात आले. मात्र, त्यानंतर लगेचच कलमाची पुन्हा नव्याने रचना करण्यात आली आणि आता ते असे म्हणते..

124(अ) देशद्रोह : भारतात कायद्याद्वारे स्थापित झालेल्या सरकारविरोधात कोणीही, शब्दांनी, लिखित अथवा वाचिक, किंवा काही चिन्हांनी अथवा दृश्य प्रातिनिधिकतेने, किंवा इतर कोणत्याही माध्यमातून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल अथवा सरकारचा अवमान करत असेल किंवा सरकारविरोधात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न अथवा असंतोष निर्माण करत असेल, तर त्यास आजीवन कारावास, ज्यात आर्थिक दंडाचाही समावेश असेल, किंवा तीन वर्षांचा कारावास व आर्थिक दंड किंवा आर्थिक दंड, ही शिक्षा केली जावी.

स्पष्टीकरण 1 : ‘असंतोष’ म्हणजे सरकारप्रती अनास्था अथवा अप्रामाणिक असणे आणि शत्रुत्वाच्या भावना जपणे.
स्पष्टीकरण 2 : सरकारबाबत द्वेषभावना निर्माण होईल, त्यांचा अवमान होईल अथवा त्यांच्याबाबत असंतोष निर्माण होईल, अशा पद्धतीचे कोणतेही वक्तव्य न करता सनदशीर मार्गाने सरकारच्या उपाययोजनांबाबत नापसंती व्यक्त करत त्यांचे लक्ष वेधून घेणे, हा या कलमांतर्गत गुन्हा ठरू शकत नाही.
स्पष्टीकरण 3 : प्रशासकीय अथवा सरकारच्या इतर कोणत्याही कृतीबाबत नापसंती व्यक्त करताना सरकारबाबत द्वेषभावना निर्माण होईल, त्यांचा अवमान होईल अथवा त्यांच्याबाबत असंतोष निर्माण होईल, असे कोणतेही वक्तव्य न करणे, हा या कलमांतर्गत गुन्हा ठरू शकत नाही....!!!
__________
https://t.me/PSI_MPSC