Get Mystery Box with random crypto!

महिला व बालविकास विभागातील गट-अ पदांचे सुधारित सेवा प्रवेश निय | MPSC History

महिला व बालविकास विभागातील गट-अ पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम

महिला व बालविकास आयुक्तालयामधील (1)बालविकास प्रकल्प अधिकारी(नागरी),
(2)सहायक आयुक्त,
(3)परिविक्षा अधीक्षक,
(4)जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,
(5)जिल्हा कार्यक्रम अधिकारी(महिला व बालविकास), जिल्हा परिषद
वरील गट-अ पदांचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून सुधारित करून अधिसूचित करण्यात आले आहेत.

शैक्षणिक अर्हता:- सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा:- किमान 19 व कमाल 38 वर्षे

प्रस्तुत पदे आयोगामार्फत आयोजित राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येतील.
राज्यसेवा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या इतर संवर्गाप्रमाणे प्रस्तुत संवर्गांच्या पदांचे प्रशिक्षण एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) द्वारे आयोजित करण्यात येणार आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts