Get Mystery Box with random crypto!

उद्रेकानुसार ज्वालामुखीचे प्रकार: १).केंद्रीय ज्वालामुखी :  | MPSC Geography

उद्रेकानुसार ज्वालामुखीचे प्रकार:

).केंद्रीय ज्वालामुखी : 

ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी लाव्हारस एखाद्या नळीसारख्या भागातून बाहेर पडतो ,तेव्हा त्यास केंद्रीय ज्वालामुखी म्हणतात
या क्रियेत ज्वालामुखीतून बाहेर पडलेले पदार्थ नळीच्या मुखाभोवती साचतात .त्यामुळे शंकूच्या आकाराच्या ज्वालामुखीय पर्वतांची निर्मिती होते.उदा.किलीमांजारो तांझिया


२).भेगीय ज्वालामुखी :

 ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी लाव्हारस ज्या वेळेस अनेक भेगातून बाहेर पडतो , त्यास भेगीय ज्वालामुखी म्हणतात .या क्रियेत ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ भेगांभोवती साचतात .त्यामुळे ज्वालामुखीत पठाराची निर्मिती होते उदा. महाराष्ट्र पठार