भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार- १) रामसर करार - वर्ष - १९७१ * दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर * अमलात येण्याचे वर्ष - १९७५ * भारताने मान्य केला - १९८२ २) CITES - वर्ष - १९७३ * संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण *अमलात येण्याचे वर्ष - १९७६ * भारताने मान्य केला - १९८० ३) बोन करार - वर्ष -१९७९ * स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन * अमलात येण्याचे वर्ष - १९८३ * भारताने मान्य केला -१९८३ ४) व्हिएन्ना करार - वर्ष - १९८५ * ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८ * भारताने मान्य केला - १९९१ ५) बँसेल करार - वर्ष - १९८९ * हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट * अमलात येण्याचे वर्ष - १९९२ * भारताने मान्य केला - १९९ २६) UNFCCC - वर्ष - १९९२ * हवामान बदल रोखणे * अमलात येण्याचे वर्ष - १९९४ * भारताने मान्य केला - १९९३ ७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७ * हरितवायू उत्सर्जनात घट * अमलात येण्याचे वर्ष - २००५ * भारताने मान्य केला - २००२ ८) CBD जैवविविधता करार - वर्ष -१९९२ * जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन * अमलात येण्याचे वर्ष - १९९३ * भारताने मान्य वर्ष - १९९४ ९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल - वर्ष - २००० * जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण * अमलात येण्याचे वर्ष - २००३ * भारताने मान्य केला - २००३ १०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार - वर्ष - १९९४ * वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण * अमलात येण्याचे वर्ष - १९९६ * भारताने मान्य केला - १९९६ ११) रोटरडँम करार - वर्ष - १९९८ * हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे . * अमलात येण्याचे वर्ष - २००४ * भारताने मान्य केला - २००५ १२) स्टॉकहोम करार - वर्ष - २००१ *अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण . ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार * अमलात येण्याचे वर्ष - २००४ * भारताने मान्य केला - २००६ ______________________________________ Join us here @MPSCScience 5.2K views01:31