Get Mystery Box with random crypto!

​ आज जागतिक महासागर दिवस. पृथ्वीच्या ७३ टक्के भागात पसरलेल्या | MPSC Geography

​ आज जागतिक महासागर दिवस.

पृथ्वीच्या ७३ टक्के भागात पसरलेल्या महासागरांचे वैशिष्ट्य टिकवून ठेवावे, यासाठी काय-काय करता येईल, या दृष्टीने २००३ पासून जगभरात विचार सुरू झाला. 'जागतिक महासागर दिन' साजरा करण्याची कल्पना त्यातूनच जन्माला आली.

महासागर कितीही विशाल असले तरी माणसाने केलेला किती कचरा त्यांनी पोटात घ्यावा यालाही अखेर काही मर्यादा आहे. आपण ही मर्यादा ओलांडल्यामुळे तेथील जीवसृष्टीला आणि अन्नसाखळ्यांना धक्का बसला आहे. यामुळे माणसाला मिळणारे मासे तर कमी झाले आहेतच, शिवाय हवामानावरही विपरीत परिणाम होत आहे.

सांडपाणी, औद्योगिक प्रदूषके, मुदत संपलेली वा घातक रसायने, प्लास्टिकच्या बाटल्या नि पिशव्या... कचरा कोणताही असो- “फेका समुद्रात!” अहो केवढा मोठा आणि खोल समुद्र असतो समुद्र, एवढ्याशा कच-याने काय होतंय? ही प्रथा जगभरातील (व्यक्तीपासून राष्ट्रांपर्यंत) बहुतेक सर्वांनीच पाळल्यामुळे आता मात्र परिस्थिती गंभीर बनली आहे. मासे मिळवण्यासाठी अधिकाधिक खोल समुद्रात जावे लागत आहे, पाण्याचा दर्जा घसरला आहे. हवामानावर परिणाम होत आहे. विशिष्ट सजीव नष्ट होऊ लागले आहेत... हे सारे थांबविणे हेच या दिनाचे खरे उद्दिष्टे आहे.