Get Mystery Box with random crypto!

आशियाई कुस्ती स्पर्धा - सरिताला सुवर्णपदक भारताची कुस्तीपटू स | MPSC STUDENT™

आशियाई कुस्ती स्पर्धा - सरिताला सुवर्णपदक

भारताची कुस्तीपटू सरिता मोर हिने जोमाने पुनरागमन करत मोंगोलियाच्या शूवदोर बातारजाव हिचे आव्हान परतवून लावत सलग दुुसऱ्यांदा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. सीमा बिस्ला (५० किलो) आणि पूजा (७६ किलो) यांना कांस्यपदक मिळाले.

अंतिम फेरीची लढत संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना सरिता १-७ अशी पिछाडीवर पडली होती. पण ५९ किलो वजनी गटात पंचांकडे दाद मागण्याचा भारताचा निर्णय फसल्यानंतर बातारजावला चार गुणांची बढत मिळाली. त्यातच सरिताने स्वत:वरील नियंत्रण सुटल्यामुळे बातारजावला आणखी एक गुण मिळवता आला. बातारजावने ७-१ अशी आघाडी घेतल्यानंतर सरिताने पुनरागमन केले.

बातारजावविरुद्ध चाल रचत सरिताने चार गुणांची कमाई केली. त्यानंतर बातारजावला रिंगणाच्या बाहेर ढकलत सरिताने ७-७ अशी बरोबरी साधली. अवघ्या २० सेकंदांचा खेळ शिल्लक असताना सरिताने आणखी एक डावपेच आखत गुण वसूल केले. अखेरीस १०-७ अशा फरकाच्या आधारे सरिताने या स्पर्धेतील सलग दुसरे सुवर्णपदक प्राप्त केले.

प्रतिस्पर्धी २०१८ सालची जागतिक कांस्यपदक विजेती असल्याने हा सामना माझ्यासाठी खडतर होता. पण मी माझ्यापरीने सामन्याची तयारी केली होती. पहिल्याच सामन्यात तिच्याकडून हरल्यानंतर अंतिम फेरीत मी रणनीतीची योग्य अंमलबजावणी केली.