Get Mystery Box with random crypto!

MPSC_CURRENT_AFFIARS_2021

टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_current_affiers_2021 — MPSC_CURRENT_AFFIARS_2021 M
टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_current_affiers_2021 — MPSC_CURRENT_AFFIARS_2021
चैनल का पता: @mpsc_current_affiers_2021
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 7.86K
चैनल से विवरण

◆महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC)परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शनपर एक व्यासपीठ
◆ Daily प्रश्न उत्तरे
◆ महत्वाच्या PDFs फाइल्स
◆ नोट्स
◆ MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चँनल 🏆
Jion करा👇
@MPSC_CURRENT_AFFIERS_2021
🎯निलेश वाघमारे : @nilesh12123

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 32

2021-08-23 08:28:20
डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स : एलिन जगातील दुसऱ्या क्रमांकाची वेगवान धावपटू
Source : Loksatta

युजिन : ऑलिम्पिक विजेत्या एलिन थॉम्पसन-हेराहने शनिवारी युजिन डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये महिलांच्या १०० मीटर शर्यतीमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम वेळ नोंदवली.

तिने ही शर्यत १०.५४ सेकंदांत पूर्ण केली. सर्वोत्तम वेळेचा जागतिक विक्रम अमेरिकेच्या फ्लोरेन्स ग्रिफिथ-जॉयनरच्या (१०.४९ सेकंद) नावावर आहे.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर आणि २०० मीटरमध्ये सुवर्णपदके जिंकण्याची किमया साधणाऱ्या एलिन हिने शेली-अ‍ॅन फ्रेसर-प्रायसेला दोन-दशांश सेकंदांच्या फरकाने हरवून सर्वानाच धक्का दिला.

शेरिका जॅक्सनला तिसरा क्रमांक मिळवून या शर्यतीमधील जमैकाचे वर्चस्व सिद्ध केले.

‘‘सुवर्णपदकासह सर्वोत्तम वेळ हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे. कारण गेल्या पाच वर्षांत इतक्या वेगाने मी कधीच धावले नव्हते.

२०० मीटर शर्यतीतही विक्रमी वेळ नोंदवण्यास मी उत्सुक आहे,’’ असे एलिनने सांगितले.
151 views05:28
ओपन / कमेंट
2021-08-22 05:52:53
चीन : तीन अपत्ये धोरणास मंजुरी
Loksatta :Loksatta

बीजिंग : चीनच्या संसदेत राष्ट्रीय विधिमंडळाने शुक्रवारी तीन अपत्ये धोरणास मंजुरी दिली. 

चीनमध्ये जन्मदर कमी झाल्याने तीन मुले जन्माला घालणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन देण्यात येणार असून सुधारित कायदा मंजूर करण्यात आला आहे.

वाढत्या खर्चामुळे सध्या कोणीही अधिक मुले जन्माला घालत नाही.

आता सुधारित कायद्यात तीन मुलांना जन्म देणाऱ्या जोडप्यांना सामाजिक व आर्थिक लाभ देण्यात येणार आहेत.

कर, विमा शिक्षण, गृहनिर्माण यात लाभ देऊन कुटुंबावरील आर्थिक बोजा कमी करण्यात येईल.

त्यामुळे मुले वाढवण्याचा खर्चही आपोआप कमी होईल असे चायना डेलीने म्हटले आहे. 

समतोल लोकसंख्या वाढ असे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.
118 views02:52
ओपन / कमेंट
2021-08-22 05:42:28 जिल्हा परिषद भरती परीक्षा 2019

पद संख्यामध्ये झालेले बदल

(SEBC (मराठा)आरक्षण रद्द झाल्यामुळे ती पदे खुल्या प्रवर्गातून भरतील तसेच आरक्षण बदल झाल्यामुळे काही पदे वाढ किंवा घट झालेली,तसेच अपंग आरक्षण बदल झाला आहे.)
121 views02:42
ओपन / कमेंट