Get Mystery Box with random crypto!

*महत्त्वाची घोषणा* *महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन, महाराष्ट्र | 🅜🅛🅢🅐(मालसा)™

*महत्त्वाची घोषणा*

*महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य* गेल्या दोन वर्षापासून विधी विद्यार्थ्यांचा विविध अडचणी सोडवण्यात अग्रेसर आहे. संघटनेद्वारे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन, internship साठी मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या विविध अडचणींसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणे तसेच इतर कामे केली जातात.
ह्याचाच एक भाग म्हणून संघटनेच्या सीईटी मार्गदर्शन विभागाद्वारे लवकरच एक *सीईटी सराव परीक्षा* घेत आहोत.
सराव परीक्षेची काही वैशिष्ट्ये:
१. *संपूर्णतः मोफत* असेल.
२. *गुगल फॉर्म द्वारे* घेत असल्याने कुठेही बसून देऊ शकता.
३. परीक्षेत तुम्हाला मिळालेले *गुण लगेचच कळतील* आणि त्यामुळे आपली किती तयारी झाली आहे हे कळेल.
४. मिळालेले गुण लगेच कळल्याने विद्यार्थ्यांना *तयारीची दिशा ठरवण्यासाठी मदत होईल*.
५. सराव परीक्षेनंतर *शंकांचे निरसन करण्यासाठी* संघटनेचा सीईटी मार्गदर्शन विभाग प्रमुख *श्री. तुषार राऊत सर* (+919511789249 ह्या भ्रमणध्वनी क्रमांकावर) *उपलब्ध असतील*.

आपला,
अशोक बेदरे,
अध्यक्ष,
महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य.

टीप:
पुढील माहितीसाठी कृपया संघटनेचे खालील चॅनल जॉईन करावे:
१. सीईटी मार्गदर्शन विभागाचे टेलिग्राम चॅनल:
https://t.me/MLSA_LawCET
२. संघटनेचे टेलिग्राम चॅनल:
https://t.me/MLSA2021