Get Mystery Box with random crypto!

MDMA

टेलीग्राम चैनल का लोगो mdmaportals — MDMA M
टेलीग्राम चैनल का लोगो mdmaportals — MDMA
चैनल का पता: @mdmaportals
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 197
चैनल से विवरण

महा डिजिटल मिडिया असोसिएशन स्व नियामक संस्थेचे अधिकृत टेलिग्राम चैनल. अधिक माहितीसाठी व्हाट्सअँप क्रमांक 98 22 66 87 86 वर संदेश पाठवा.
किंवा अधिकृत वेबसाईट https://mdma.co.in येथे भेट द्या

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2022-05-16 07:24:56
2.7K views04:24
ओपन / कमेंट
2022-05-16 06:44:54
Join "Aadvaith Global" and get access to study material, live classes, mock tests, guidance and more.

Download Now: http://on-app.in/app/home/app/home?orgCode=rbpxp
130 views03:44
ओपन / कमेंट
2022-05-16 06:36:42 *सुप्रभात मित्रांनो*
अद्वैत कन्सल्टन्सी च्या सर्व ग्राहकांना तसेच भविष्यामध्ये अद्वैत कन्सल्टन्सी च्या सेवा हव्या असणार्‍या सर्वांना कळविण्यात येते की सर्व सुविधा शक्य तेवढ्या लवकर मिळण्यासाठी आम्ही अद्वैत ग्लोबल हे नवीन ॲप लॉन्च केले असून भविष्यामध्ये वेबसाइट संबंधी अथवा इतर कोणत्याही बाबतीत माहिती किंवा मदत हवी असल्यास फक्त ॲप द्वारे मदत केली जाईल यासाठी कोणत्याही प्रकारचे कॉल स्वीकारल्या जाणार नाहीत.
ॲप द्वारे आम्ही 24X7 ग्राहक सेवा सुरू केली आहे.
ॲप द्वारे संपर्क कसा करायचा यावर आज रात्री एक लाइव्ह व्हिडिओ केला जाईल. तरी आपण अद्वैत ग्लोबल चे ॲप इन्स्टॉल करून आमच्या ग्राहक सेवा केंद्राचे सुविधा प्राप्त कराव्यात.

https://play.google.com/store/apps/details?id=co.marshal.rbpxp

App Link
सध्या सर्वच वेबसाईड एका सर्व्हर वरून दुसऱ्या सरव्हर ला ट्रान्सफर करणे चालु आहे त्यामुळे आपल्याला दोन-तीन दिवस थोडी अडचण जाऊ शकते. एकदा सर्व वेबसाइट एका सर्व्हरवर आल्या की कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही.
116 views03:36
ओपन / कमेंट
2022-05-15 18:36:04 *अद्वैत ग्लोबल आजपासून सेवेत*
मित्रांनो अद्वैत कन्सल्टन्सी आणि वकीलपत्र यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून तसेच महा डिजिटल मीडिया असोसिएशनच्या सहयोगाने आत्तापर्यंत मी व्यक्तिशः अनेक व्हिडिओ शैक्षणिक तसेच व्यावसायिक उपयोगासाठी तयार केले. मात्र यूट्यूब वरील व्हिडिओ सहज उपलब्ध व कॉलिटी कन्टेन्ट च्या बाबतीत सरस असल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र आज माझ्या अद्वैत ग्लोबल या प्रकल्पाचे लॉन्चिंग झाले असून याच्या माध्यमातून कायदा या विषयासह वैद्यकीय इंजिनिअरिंग आणि इतर सर्वच विषयावर शैक्षणिक तसेच व्यावहारिक जीवनामध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयाला वाहिलेले पेड व्हिडिओ कोर्सेस उपलब्ध असणार आहेत. संपूर्णपणे व्यावसायिक दृष्ट्या तयार केलेले कोर्सेस असल्यामुळे अद्वैत ग्लोबल ला चांगला प्रतिसाद मिळेल याबद्दल आम्हाला खात्री आहे.
*मागील तीन महिन्यापासून मी टीम सहित याच विषयावर काम करत असून आज ऑफिशियल लॉन्चिंग केली आहे. त्याचबरोबर कन्सल्टन्सी च्या ग्राहकांना आता कोणत्याही कामासाठी मला वैयक्तिक कॉल करायची गरज पडणार नाही आता आम्ही माफक शुल्क आकारून सर्व सेवा तात्काळ उपलब्ध करण्याच्या दृष्टीने ॲपमध्ये सुविधा उपलब्ध करून देत आहोत*
याच विषयावर माहिती देणारा लाईव्ह कार्यक्रम आज रात्री साडेनऊ वाजता वकील पत्र युट्युब वर प्रसारित करण्यात येईल तांत्रिक अडचणीमुळे व्हिडिओ ऑफ राहील फक्त ऑडिओ लाईव्ह कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमाची लिंक खाली दिली आहे






*अद्वैत ग्लोबल चे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा प्ले स्टोर वरून अद्वैत ग्लोबलचे ॲप डाऊनलोड करून घ्या*

https://play.google.com/store/apps/details?id=co.marshal.rbpxp
743 views15:36
ओपन / कमेंट
2022-05-10 05:58:25 *नमस्कार मित्रांनो हा अद्वैत कन्सल्टन्सीच्या ग्राहकांसाठी ब्रॉडकास्ट संदेश आहे*

मी काल रात्री नवी दिल्ली वरून अमरावती येथे परत आलेला असून ज्यांच्या वेबसाईट बंद आहेत त्यांनी मला आज दुपारी दोन ते पाच या वेळेमध्ये संपर्क करावा. वेबसाइट चालू आहे मात्र इतर कामे पेंडिंग आहेत त्यांनी मला उद्या दुपारी दोन ते पाच या वेळेत कॉल करावा. ज्यांच्या वेबसाईट बंद आहेत त्यांना प्राधान्य क्रमाने आज वेबसाइट चालू करून देण्यात येतील.

*गुगल अड्सेंस बाबतीत आम्ही अद्ययावत पेड कोर्स लॉन्च करत असून याबाबतची माहिती आज रात्री साडेनऊ वाजता लाईव्ह कार्यक्रमातून दिली जाईल*
142 views02:58
ओपन / कमेंट
2022-04-24 18:17:04 *न्यूज पोर्टल नोंदणी शेवटचा दिवस*

महाराष्ट्रातील सर्व डिजिटल मीडियाच्या संपादकांना कळविण्यात येते की त्यांच्या न्युज वेबसाईटची नोंदणी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे करण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया करायची आहे याबाबत माहिती देण्यासाठी आज रात्री साडेनऊ वाजता लाईव्ह च्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे. आपण सर्वांनी खालील लिंक ला क्लिक करून या कार्यक्रमात उपस्थित रहावे तसेच आपल्या सर्व डिजिटल मीडियाच्या संपादकांना हि लिंक शेअर करावी जेणेकरून महाराष्ट्रातील कोणत्याही संपादक नोंदणीपासून वंचित राहणार नाही.



191 views15:17
ओपन / कमेंट
2022-04-24 08:35:57 अत्यंत महत्त्वाचे

अत्यंत महत्त्वाचे


https://forms.gle/5eA8YN2aCPqYYgxi6

आपल्या न्युज वेबसाइटची नोंदणी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे करण्यासाठी खालील गुगल फॉर्म व्यवस्थित वाचून भरा यापूर्वी आपण कितीही वेळा फॉर्म भरला असेल तरीसुद्धा हा फॉर्म भरणे गरजेचे आहे. उद्या सायंकाळपर्यंत ज्यांनी फॉर्म भरला त्यांची यादी माहिती आणि प्रसारण मंत्रालय नवी दिल्ली येथे देण्यात येईल. फॉर्म भरताना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कसे लिहायचे याबाबत माहिती तेथे दिली आहे त्यानुसारच व्यवस्थित फॉर्म भरा. आपल्या परिचयातील सर्व पोर्टलच्या मालकांना हा फॉर्म शेअर करा. प्रतिनिधी सोबत शेअर करू नका फक्त पोर्टल चे मालक हा फॉर्म भरू शकतात.
1.2K views05:35
ओपन / कमेंट
2022-04-23 18:21:46 *लाईव्ह बद्दल*
मित्रांनो डिजिटल मीडिया आणि सेल्फ रेग्युलेटरी बॉडी या विषयावर मी आज रात्री साडेनऊ वाजता वकिलपत्र यूट्यूब चैनल वर लाईव्ह येणार आहे. आपल्या परिचित असलेल्या सर्व डिजिटल मीडियाच्या पत्रकारांसोबत खालील लिंक शेअर करून या कार्यक्रमाला उपस्थित राहायला सांगा.



139 views15:21
ओपन / कमेंट
2022-04-21 19:23:03 *डिजिटल मीडिया साठी अत्यंत महत्त्वाचे*
हा ब्रॉडकास्ट संदेश आहे आपण डिजिटल मीडियाशी संबंधित नसाल तर या संदेशा कडे दुर्लक्ष करा.
मित्रांनो आज दिवसभरामध्ये "आमच्या पोर्टलची सरकारकडे नोंदणी झाली असून आता आम्हाला सरकारने रजिस्ट्रेशन क्रमांक दिला आहे"असा संदेश व्हायरल होत आहे. याबाबत स्पष्ट सांगू इच्छितो की हि नोंदणी कोणत्याही पोर्टल बाबत नसून स्व नियामक संस्थेची नोंदणी असू शकते. महा डिजिटल मीडिया असोसिएशन ही महाराष्ट्रातून सरकारकडे स्वानियमक संस्थेसाठी अर्ज करणारी पहिली संघटना असून शासनाचे काही धोरण डिजिटल मीडिया च्या विरोधात असल्यामुळे आम्ही यावर केंद्रीय पातळीवर चर्चा करत आहोत. मित्रांनो डिजिटल मीडियाच्या स्व नियामक संस्थेमध्ये फुकट प्रसिद्धी मिळवणारे लोक घेतल्या पेक्षा ज्यांना डिजिटल मीडिया ची जाण आहे किंवा ज्यांचा स्वतःचा डिजिटल मीडिया आहे अशाच लोकांना संधी द्यावी असे महा डिजिटल मीडिया असोसिएशनचे याबाबत मत आहे. त्याचबरोबर तांत्रिक कारणामुळे सुद्धा आम्ही याबाबतीत सरकारकडे काही वेळ मागितलेला आहे.
डिजिटल मीडियाच्या पोर्टल ला केंद्र सरकारकडून कोणताही नोंदणी क्रमांक मिळत नसतो. फक्त तुमच्या पोर्टल ची माहिती केंद्र सरकारकडे पाठवून देणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा व्हायरल संदेश यावर विश्वास ठेवून कोणत्याही प्रकारचे चुकीचे व्यवहार करून स्वतःची फसवणूक करून घेऊ नये.
शासनाने केवळ बंधने लादून डिजिटल मीडियाचे कोंडी न करता त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करावे हीच महा डिजिटल मिडिया असोसिएशनची मागणी आहे.

ॲड. अद्वैत चव्हाण
हायकोर्ट नागपूर
140 views16:23
ओपन / कमेंट
2022-04-08 19:11:51 *अत्यंत महत्वाची सूचना*
न्यूज पोर्टल यूट्यूब चैनल तसेच डिजिटल मीडियाच्या विवरणपत्रा बद्दल सोशल मीडिया मध्ये एक अतिशय चुकीचा मॅसेज फिरत असून डिजिटल मीडियाच्या संपादकांना कोणत्याही प्रकारचे विवरणपत्र आर एन आय कडे द्यावे लागत नाही. मुळात आर एन आय फक्त प्रिंट मिडिया साठी काम करते. मात्र काही विघ्नसंतोषी चुकीचे मेसेज पसरवून डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना संभ्रमित करीत आहेत. माहिती व प्रसारण मंत्रालयाने ब्लॉक केलेल्या 22 यूट्यूब चॅनल बद्दल सुद्धा चुकीची माहिती या संदेशामध्ये आहे मुळात 22 यूट्यूब चॅनल वेगळ्या कारणासाठी म्हणजेच फेक माहिती पसरल्यामुळे बंद करण्यात आले आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल सोबत 22 ब्लॉक चॅनलचा संबंध जोडणे अत्यंत चुकीचे असून डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनी अशा कोणत्याही संदेशांमुळे संभ्रमित होऊ नये. डिजिटल मीडिया पत्रकारांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे त्यांच्या न्यूज पोर्टल ची माहिती पाठवली नसेल तरीही त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. माहिती न पाठवल्याने कोणतेही चॅनल ब्लॉक केल्या जात नाही याची नोंद घ्यावी.
भविष्यात अशा प्रकारचे संदेश पसरवून डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न कोणी केल्यास महा डिजिटल मिडिया असोसिएशन द्वारे संबंधितावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

जे 22 यूट्यूब चॅनल तसेच न्यूज वेबसाईट ब्लॉक करण्यात आली त्यामागील मुख्य कारण म्हणजे दर्शकांची दिशाभूल करणे हे आहे. केंद्र सरकार मान्यताप्राप्त न्यूज चॅनल च्या थीम वापरून तसेच दिशाभूल करणारे थंबनेल वापरून, देश विरोधी बातम्या चा प्रचार क
केल्यामुळे 22 यु ट्यूब चॅनल ज्यामध्ये न्यूज वेबसाईटचा सुद्धा समावेश आहेत ब्लॉक केलेले आहेत त्यामध्ये चार पाकिस्तान बेस सुद्धा आहेत.
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली.
केवळ सरकारला माहिती पाठवली नाही म्हणून कोणत्याही प्रकारचे चैनल ब्लॉक करण्याचा अधिकार सरकारकडे नाही. तुम्ही वाचकांची दिशाभूल करत असाल चुकीच्या बातम्या देत असाल तरच सरकार तुमच्यावर कार्यवाही करू शकते

ॲड.अद्वैत चव्हाण
बॉम्बे हायकोर्ट.
संस्थापक
महा डिजिटल मीडिया असोसिएशन.
1.0K views16:11
ओपन / कमेंट