Get Mystery Box with random crypto!

लॉकडाऊनमुळे अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. असाच एक इंजिनीअरही बेरो | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

लॉकडाऊनमुळे अनेकांनी नोकऱ्या गमावल्या.
असाच एक इंजिनीअरही बेरोजगार झाला.
पडेल ते काम करायचं म्हणून तो नोकरी शोधू लागला.
सगळीकडे त्याला नकारच मिळत होता.

एकेदिवशी तो सर्कस पाहायला गेला.
सर्कस पाहून त्याच्या डोक्यावरचा ताण थोडासा हलका झाला.
त्यातच त्याला सूचलं की, इथे एखादी तरी नोकरी नक्कीच असेल.

तो सर्कस अरेंज करणाऱ्या मुख्य मालकापर्यंत जाऊन पोहोचला आणि नोकरीसाठी विचारणा केली.
त्या मालकानेही जवळपास नकारच कळवला.
फक्त एक माकडाचा गणवेश घालून लोकांना हसवण्याचं काम आहे असं त्याने सांगितलं
बेरोजगार इंजिनीअर एका पायावर तयार झाला.

दुसऱ्या दिवशी नोकरी सुरू झाली.
माकडाचे हावभाव करत लोकांना हसवण्याचं कामही छान जमायला लागलं.
एकेदिवशी माकडाचा गणवेश घालून उड्या मारणारा इंजिनीअर वरून चुकून वाघाच्या पिंजऱ्यात पडला.

लोकही आश्चर्यचकित होऊन केवळ पाहत राहिले.

आपला शेवट जवळ आलाय हे समजल्यावर तो तसाच बसून राहिला आणि या बेरोजगारीने आपला कसा बळी घेतला याचा विचार करू लागला.

तेवढ्यात दुसऱ्या टोकाला असलेला वाघ हळूहळू जवळ यायला लागला...

लोक आता स्तब्ध होऊन पाहू लागले...

शेवटी वाघ जवळ आला आणि हळूच त्या माकडाच्या कानात पुटपुटला,

*"शिंदे, घाबरू नको. मी, पळशीकर, २००९ मेकॅनिकल बॅच !"*