Get Mystery Box with random crypto!

* गंमत जंमत * गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत ह | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

* गंमत जंमत *



गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती.

मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा.
मग काय ! गाडी सुसाट !!

...

आणि अचानक वळणावर एक गाढव आडवं आलं.

गीतानी कर्ररररकचू्न ब्रेक दाबला.

वाटलं आता जाऊन धडकतेकी काय .. !!

गीतानी डोळे घट्ट मिटून घेतले..

आणि....

हुश्श.....!!
:
:
:
:
:....
गाडी गाढवाच्या अगदी जवळ जाऊन, त्याच्या पुढचं थांबली. अपघात होता होता गीता वाचली व अशाप्रकारे,

*" गाढवा पुढे वाचली गीता."*
ही म्हण प्रसिद्ध झाली.

_______

नंतर घारलेली गीता घरी आली
आणि घडलेली कथा आपला नवरा हरीला सांगितली.
तिने नवऱ्याकडे हट्टच धरला की ज्या गाढवामुळे माझे प्राण वाचले त्याला पाहुणचारासाठी घरी घेऊनच या.
मग बिचारा हरी गाढवाकडे गेला.
पण गाढवही हट्टी.
ते काही तयार होईना.
शेवटी..
अडलेल्या हरीने गाढवाचे पाय धरले. आणि

*" अडला हरी अन् गाढवाचे पाय धरी.."*

ही म्हण तेव्हापासून प्रसिद्ध झाली.

_______

शेवटी कसाबसा री गाढवाा घरी घेुन आला.

उन्हातून आल्यामुळे गीता ने गाढवास बसायला खुर्ची दिली आणि पाणी व गुळाचा तुकडा खावयास दिला ..

गाढव पाणी गटागटा प्यायला आणि मग गूळ खावयास लागला.

पण अचानक काय झाले कळलेच नाही.
गाढव पाण्याच्या गुळण्या करू लागले.

हरीला आणि गीताला हे कोडे आज पर्यंत सुटले नाही.
..
..
*" गाढवाला गुळाची चव काय "*

ही म्हण यामुळे सगळीकडे व्हायरल झाली.

_____