Get Mystery Box with random crypto!

‘महा-ऊसनोंदणी’ अ‍ॅप शेतकर्‍यांना सुलभ; अ‍ॅप गुगल प्ले-स्टोअरवर | कृषिक अँप Krushik app

‘महा-ऊसनोंदणी’ अ‍ॅप शेतकर्‍यांना सुलभ; अ‍ॅप गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध

सौजन्य : पुढारी
दिनांक : 30-Aug-22
पुणे : राज्यात चालू वर्षी 1343 लाख मेट्रिक टन इतके विक्रमी ऊसगाळप अपेक्षित आहे. ऊसनोंदणीच्या कामी साखर आयुक्तालयाने ‘महा-ऊसनोंदणी’ अ‍ॅप विकसित केलेले आहे. ते शेतकर्‍यांना वापरासाठी अत्यंत सुलभ असून, सोमवारपासून गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकर्‍यांनी ते डाऊनलोड करून त्यावरून आपल्या चालू हंगामातील ऊसक्षेत्राची माहिती भरावी लागेल.
अ‍ॅपमध्ये ऊसलागवडीचा जिल्हा, तालुका, गाव व गट नंबरनिहाय माहिती भरल्यावर इतर माहितीसह ऊसक्षेत्राची माहिती भरावी. त्यानंतर कोणत्या कारखान्याला या ऊसनोंदणीसाठी कळवायचे, यासाठी कारखान्यांचे तीन पर्याय भरता येतील. आयुक्तालय ही माहिती संबंधित जवळच्या कारखान्याकडे पाठवून देईल. त्यानंतर शेतकर्‍याला साखर कारखान्यामधील आपली ऊसनोंदणीची माहिती पाहता येईल.
या अ‍ॅपच्या माध्यमातून साखर आयुक्तालय राज्यातील 100 सहकारी व 100 खासगी अशा एकूण 200 कारखान्यांकडे ऊसनोंदणीची माहिती पाठवू शकणार असल्याची माहिती साखर सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके यांनी दिली. सहकारमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत अ‍ॅपच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित ऊस उत्पादक शेतकरी विकास जगताप म्हणाले, ‘ऊसनोंदीचा अ‍ॅप मराठीत असून, वापरण्यास सुलभ आहे. शिवाय तांत्रिकदृष्ट्या तो सोपा व त्यामध्ये माहिती भरण्यास सोपा असल्याने आम्ही ऊसनोंदणी करू शकलो.’
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en