Get Mystery Box with random crypto!

*पाऊस पुनरागमन करण्याची शक्यता* सौजन्य : अॅग्राेवन दिनांक | कृषिक अँप Krushik app

*पाऊस पुनरागमन करण्याची शक्यता*

सौजन्य : अॅग्राेवन
दिनांक : 29-Aug-22
पुणे : राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. यातच उघडीप दिलेला पाऊस पुनरागमन करण्याची शक्यता आहे. आज (ता. २९) दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे. बिहार आणि परिसरावर, उत्तर प्रदेश, तसेच केरळ परिसरावर वेगवेगळ्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. विदर्भापासून आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अंदमान समुद्रापासून तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
पावसाची उघडीप, अंशतः ढगाळ हवामान, स्वच्छ सूर्य प्रकाश यामुळे राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. आज (ता. २९) मध्य महाराष्ट्रातील सातारा. सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांसह विदर्भातील जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीप राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : सातारा, सोलापूर, सांगली, लातूर, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, वशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en