Get Mystery Box with random crypto!

*जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी मिळणार अनुदान* सौजन | कृषिक अँप Krushik app

*जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी मिळणार अनुदान*

सौजन्य : पुढारी
दिनांक : 26-Aug-22
पुणे : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2022-23 अंतर्गत परदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यामध्ये क्षेत्र विस्तारासाठी फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन या घटकांचा समावेश आहे. विदेशी फळे, फुले, मसाला लागवड करण्यास इच्छुक व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी व डाळिंब या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकर्‍यांनी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.
योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकर्‍यांनी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन फलोत्पादन संचालक कैलास मोते यांनी केले आहे. फुले लागवड या घटकामध्ये कट फ्लॉवर्स या घटकात अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी प्रतिहेक्टरी खर्च मर्यादा एक लाख असून, एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार रुपये प्रतिहेक्टरी अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. इतर शेतकर्‍यांसाठी एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 25 रुपये प्रतिहेक्टरी अनुदान मर्यादा राहील.
कंदवर्गीय फुले : अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी खर्च मर्यादा दीड लाख प्रतिहेक्टरी आहे, तर अनुदान मर्यादा एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 60 हजार रुपये प्रतिहेक्टरी राहील. इतर शेतकर्‍यांसाठी एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा 37 हजार 500 प्रतिहेक्टरी अनुदान मर्यादा आहे.
सुटी फुले : अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी खर्च मर्यादा प्रतिहेक्टरी 40 हजार रुपये असून, एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 16 हजार रुपये प्रतिहेक्टरी अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. इतर शेतकर्‍यांसाठी एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 10 हजार रुपये अनुदान प्रतिहेक्टरी आहे.
मसाला पीक लागवड : बियावर्गीय व कंदवर्गीय मसाला पिकांसाठी खर्च मर्यादा प्रतिहेक्टरी 30 हजार रुपये आहे, तर एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा 12 हजार रुपये अनुदान राहील. बहुवर्षीय मसाला पिकांसाठी खर्च मर्यादा प्रतिहेक्टरी 50 हजार रुपये असून, एकूण खर्चाच्या 40 टक्के रक्कम रुपये 20 हजार अनुदान राहील.
जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन : जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठीची खर्च मर्यादा प्रतिहेक्टरी 40 हजार रुपये असून खर्चाच्या 50 टक्के व जास्तीत जास्त 20 हजार रुपये अनुदान आहे.
विदेश फळपीक लागवड : ड्रॅगन फ्रुट, अंजीर व किवी यांच्यासाठी प्रतिहेक्टरी खर्च मर्यादा 4 लाख रुपये आहे, तर एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लाख 60 हजार रुपये प्रतिहेक्टरी अनुदान आहे . स्ट्रॉबेरी फळासाठीची खर्च मर्यादा 2 लाख 80 हजार रुपये असून, एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा 1 लाख 12 हजार रुपये अनुदान आहे. पॅशन फ्रुट, ब्लुबेरी, तेंदुफळ व अवॅकॅडोसाठी प्रतिहेक्टरी खर्च मर्यादा एक लाख रुपये असून, एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार रुपये अनुदान आहे.
*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.**
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en