Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला खोडवा ऊस पाणी कमतरतेच्या परिस्थितीत खोडवा पी | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
खोडवा ऊस
पाणी कमतरतेच्या परिस्थितीत खोडवा पीक व्यवस्थापन
पाचट जाळलेले असल्यास हिरवळीचे पीक आंतरपीक म्हणून घ्यावे. याचा आच्छादन म्हणून वापर करावा. ऊस तुटल्यावर एक महिन्यांनी हिरवळीच्या पिकाची टोकण पध्दतीने लागवड करुन पीक दीड महिन्याचे झाल्यावर आच्छादनासाठी वापर करावा.
पाचट आच्छादन न केलेल्या शेतकऱ्यांनी एक आड एक सरी पाण्याचे नियोजन करावे आणि पुढच्या पाण्याच्या वेळी सरी बदलावी.
पाणी उपलब्ध असल्यास खतांचा पहिला व दुसरा हप्ता देऊन पाणी द्यावे. एकाच वेळी पाणी देणे शक्य असल्यास फक्त खतांचा पहिला हप्ता देऊनच पाणी द्यावे.
पाणी उपलब्ध नसल्यास रासायनिक खते जमिनीत देऊ नयेत, खते फवारणीद्वारे द्यावीत. बगला फोडू नयेत.
पावसाळा सुरू झाल्यावर खताचा शेवटचा हप्ता देऊन पाणी द्यावे.
उसाच्या शेताभोवती दाट शेवरीची लागवड असल्यास गरम हवेचा झोत अडविला जाऊन उसाच्या पानातील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन पीक वाळत नाही.
*सुरु ऊस*
पाणी कमतरतेच्या परिस्थितीत पीक व्यवस्थापन
उसाच्या सरीमध्ये एकरी २ टन पाचटाचे आच्छादन टाकावे, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओलावा जास्त काळ टिकून राहतो. सेंद्रिय कर्बाचा पुरवठा सुद्धा होतो. हे आच्छादन ठिबक सिंचनासोबत वापरणे जरूरीचे आहे. पाचट किंवा त्याची कुट्टी आच्छादनासाठी वापरावी. प्रवाही सिंचन पद्धतीत एक आड एक सरीस पाणी द्यावे. पाण्याचा ताण पडत असल्यास पानांतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी ६ ते ८ टक्के केओलिन या बाष्परोधकाची फवारणी करावी. तसेच दर तीन आठवड्यांनी २ टक्के म्युरेट ऑफ पोटॅश आणि २ टक्के युरिया फवारणी करावी.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en