Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला कांदा-लसूण कांदा बियाण्याची साठवण मळणी केल | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
कांदा-लसूण

कांदा बियाण्याची साठवण मळणी केलेल्या बियांमध्ये १० ते १२ टक्के आर्द्रता असते. त्यामुळे स्वच्छ केल्यानंतर बी पुन्हा उन्हात पातळ पसरवून सुकू द्यावे. साठवणीसाठी बियांमध्ये ६ ते ७ टक्यांपेक्षा जास्त आर्द्रता नसावी. अशा बियांचे आयुष्य एक ते दीड वर्ष असते. बियांत पाण्याचा अंश ६ ते ७ टक्क्यांपेक्षा जास्त राहिल्यास त्यांची उगवणक्षमता कमी होते. आपल्या येथे कांदा बी काढणी उन्हाळ्यात होत असल्याने वातावरण कोरडे व उष्ण असते. त्यामुळे सुकवण चांगली होऊन बियांमध्ये ७ टक्के आर्द्रता राखणे सोपे जाते. कांदा बी जास्त दिवस साठवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पॅकिंग साहित्याचा वापर केला जातो. उदा. कापडी पिशवी, प्लॅस्टिक पिशवी, कागदी पाकीट, ॲल्युमिनियम पाकीट किंवा ॲल्युमिनियम पॉलिथिन पाकीट इत्यादी. जास्त दिवस बी चांगले ठेवण्यासाठी आर्द्रतारोधक पिशव्यांचा वापर करावा. मात्र, या पिशव्यांमध्ये बी ठेवण्याआधी बियांमध्ये ६ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता नसावी. सर्वसाधारणपणे ४०० गेजच्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये बी वाळवून भरले, तर दोन वर्ष चांगले राहू शकते. कांदा बियाणे योग्यप्रकारे पॅकिंग करून साठवले नाही, तर १२ महिन्यांच्या आतच त्याची उगवणक्षमता नष्ट होते. शीतगृहामध्ये १२-१५ अंश सेल्सिअस तापमान आणि ३५-४५ टक्के आर्द्रता असलेल्या वातावरणात बियाणे २ ते ३ वर्षांसाठी ठेवता येते. मात्र साठवणुकीआधी बियाण्याची आर्द्रता ६ टक्के पातळीवर राखलेली असावी. पॅकिंग केलेल्या बियांच्या पाकिटावर किंवा पिशवीवर जातीचे नाव, बियांचे प्रकार, पॅकिंगची तारीख, उगवणक्षमता इत्यादी सर्व बाबींची नोंद करणे आवश्यतक आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true