Get Mystery Box with random crypto!

संकल्प / आयलर्ण /IPRATHAM चे विद्यार्थी- ऑनलाईन बॅचसाठी सूचना | iLearn Centre

संकल्प / आयलर्ण /IPRATHAM चे विद्यार्थी- ऑनलाईन बॅचसाठी सूचना

सध्याची परिस्थिती पाहता ऑफलाईन बॅच सुरू व्हायला वेळ लागेल असाच चित्र आहे, पण ह्याआधी संकल्प आणि आत्ता आयलर्ण च्या मुलांना आपण ऑनलाईन बॅचेस Activate करून दिल्या आहेत. जुन्या विद्यार्थ्यांना जुलै 2020 मध्ये दिलेल्या बॅचेस लॉकडाऊन काळात राहतील, म्हणजेच त्यांना चिंता नसावी. तरीही त्या विद्यार्थ्यांना पुढची लाईव्ह बॅच त्याच मोबाईल क्रमांकावर Activate करायची असल्यास बॅचची 50% फीस भरून करता येईल.त्यासाठी Harish Sir : 7722001140 ह्या क्रमांकावर संपर्क करावा. एकदा मिळालेली कोणतीही बॅच SBI PO लेव्हल पर्यंत घेतलेली आहे त्यामुळे पुन्हा बॅच करण्याची गरज पडणार नाही असं आमचं मत आहे.

बॅच संपलेल्या विद्यार्थ्यांना Faculty कॉन्टॅक्ट नंबर दिलेले असल्याने त्यांनी नियमित Faculty च्या टच मध्ये राहावं. आणि सांगितलेला शेड्युल फॉलो करावा.

कोणती परीक्षा होवो अथवा न होवो, आपल्या हातात ह्या वर्षीचं IBPS Calendar आहे, नवीन विद्यार्थ्यांनी त्याला टार्गेट करणं कधीही फायदेशीर आणि जुन्या विद्यार्थ्यांना सांगितलेले पुस्तकं संपवून ऑनलाईन टेस्ट च्या मागे लागणे.

मागच्या वर्षी GA चं जवळपास सर्वच मेन्स परीक्षेत स्कोअरिंग सब्जेक्ट असं झालेलं नाव पुसून निघालं, सध्या GA सोबत QA+LR कॉम्बो वर चांगलं काम करा. भरपूर वेळ मिळतोय त्याचा सदुपयोग करा.

सध्या ऑनलाईन मोड विद्यार्थ्यांना इच्छा असून/नसून सर्वांनी स्विकारलाय, आणि त्याला दुसरा पर्याय पण नाही. ऑफलाईन कोचिंग थांबलं म्हणजे परीक्षा थांबणार नाही, त्यामुळे अभ्यासाची लय महत्वाची, टिचिंग च मध्यम न्हवे.

बॅच ऍडमिशन बद्दल जुन्या विद्यार्थ्यांना कसलाही डाऊट असेल तर संकल्प एज्युकेशन च्या विद्यार्थ्यांनी 9637272720 (गोविंद सर) वर तर आयलर्ण च्या विद्यार्थ्यांनी 8956145298 (सचिन सर) संपर्क करावा.

ऑफलाईन बॅच जशी परिस्थिती निवळली, आणि स्पर्धा परीक्षा कोचिंग सुरू करण्यास महापालिकेने परवानगी दिली तशी आपण सुरू करू. त्याबद्दल निर्देश YouTube लेक्चरद्वारे दिले जातील.

मे महिन्यापासून Team iPratham Faculty चे YouTube लेक्चर नियमितपणे सुरू होतील.