Get Mystery Box with random crypto!

राष्ट्रीय पंचायती राज दिन: २४ एप्रिल भारतात 24 एप्रिल रोजी र | Current affairs by sakhare sir📘📝

राष्ट्रीय पंचायती राज दिन: २४ एप्रिल
भारतात 24 एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायती राज दिन साजरा केले जाते.

इतिहास : लॉर्ड रिपन या इंग्रज अधिकाऱ्याला भारतीय पंचायत राज व्यवस्थेचा जनक मानले जाते. लॉर्ड रिपनने भारतात 12 मे 1882 ला स्थानिक स्वराज्य संस्था सुरू केल्या आहेत.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायत राज हे नाव दिले.

24 एप्रिल 1993 ला 73 वी घटना दुरुस्ती करुन पंचायत राज व्यवस्था अधिकृत करण्यात  आली.

पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील बगदरी गावात 2 ऑक्टोबर 1959 पहिल्यांदा पंचायत राज व्यवस्था सुरू केली.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 24 एप्रिल 2010 ला राष्ट्रीय पंचायत राज दिनाची घोषणा केली. तेव्हापासून भारतात 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्था स्विकारणारे 9 वे राज्य आहे.

पहिल्यांदा राजस्थानने पंचायत राज व्यवस्था स्विकारली आहे. त्यानंतर आंध्रप्रदेशाने 1 नोव्हेंबर 1959 ला पंचायत राज व्यवस्था स्विकारली आहे.

महाराष्ट्राने पंचायत राज व्यवस्था लागू करण्यासाठी वसंतराव नाईक समिती 1960 ला नेमली होती. या समितीने आपला अहवाल 15 मार्च 1961 ला शासनाला सादर केला होता. 1 एप्रिल 1961 ला सरकारने हा अहवाल स्विकारला होता. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती.

1 मे 1962 ला सरकारने महाराष्ट्र राज्यात पंचायत राज व्यवस्था लागू केली. त्यानुसार वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीवरुन महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 तयार करण्यात आला.