Get Mystery Box with random crypto!

13 एप्रिल 1919 जालीयनवाला बाग हत्याकांड :-13 एप्रिल 1919 हा अस | Current affairs by sakhare sir📘📝

13 एप्रिल 1919 जालीयनवाला बाग हत्याकांड :-13 एप्रिल 1919 हा असा दिवस होता, जेव्हा अमृतसर येथिल जालियनवाला बाग येथे शांततापूर्ण मेळाव्यासाठी जमलेल्या हजारो भारतीयांवर ब्रिटीशांनी अंदाधुंद गोळीबार केला होता.

बैसाखीच्या सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे भारताचा इतिहास बदलला गेला.

आजच्याच दिवशी म्हणजे 13 एप्रिल 1699 रोजी शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली.


13 एप्रिल 1699 : गुरु गोविंद सिंग यांनी खालसा दलाची स्थापना केली.

बैसाखीच्या सणाच्या दिवशी, 13 एप्रिल 1699 रोजी शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंह (Guru Gobind Singh) यांनी खालसा दलाची स्थापना केली.

खालसा दलाची स्थापना ही शीख धर्माच्या इतिहासातील महत्वाची घटना होती. शिखांचे नववे गुरु तेगबहादुर यांच्यानंतर श्री गुरु गोविंद सिंह हे 11 नोव्हेंबर 1675 रोजी शिखांचे दहावे गुरु म्हणून गादीवर विराजमान झाले होते.