Get Mystery Box with random crypto!

4 फेब्रुवारी :- जागतिक कर्करोग दिवस. World Cancer Day 2023 : द | Current affairs by sakhare sir📘📝

4 फेब्रुवारी :- जागतिक कर्करोग दिवस.
World Cancer Day 2023 : दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी 'जागतिक कर्करोग दिन' जगभर (World Cancer Day 2023) साजरा केला जातो. जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यामागचा उद्देश (World Cancer Day Purpose) लोकांना कॅन्सरबद्दल जागरूक करणं आहे.

जागतिक कर्करोग दिनाचा इतिहास :-

पॅरिस (Paris) येथे न्यू मिलेनियमसाठी जागतिक कर्करोग परिषद आयोजित करण्यात आली होती. युनेस्कोचे तत्कालीन महासंचालक कोइचिरो मत्सुरा (Koichiro Matsuura) आणि फ्रान्सचे माजी अध्यक्ष जॅक शिराक (Jacques Chirac) यांनी पॅरिसच्या चार्टरवर (The Charter of Paris against Cancer) सही केली अन् त्या दिवसापासून हा दिवस साजरा होऊ लागला.

कर्करोगाचा प्रभाव कमी करण्याच्या दिशेने काम करण्यासाठी सरकार, आरोग्य व्यावसायिक आणि सामान्य लोकांसह विविध भागधारकांना एकत्र आणणे हा या दिवसाचा उद्देश आहे.

तीन वर्षांसाठी म्हणजे 2022, 2023 आणि 2024 साठी जागतिक कर्करोग दिनाची "क्लोज द केयर गैप" थीम आहे. म्हणूनच या वर्षीची थीम (World Cancer Day Theme 2023) देखील तिच आहे.