Get Mystery Box with random crypto!

सुरक्षा मंडळ अध्यक्षपदाची भारताची मुदत संपुष्टात संयुक्त | CrackedSoft

सुरक्षा मंडळ अध्यक्षपदाची भारताची मुदत संपुष्टात

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाच्या अध्यक्षपदी भारताची एक महिन्याची मुदत संपुष्टात आली असून जागतिक पातळीवर भारताने या काळात चांगला ठसा उमटवला आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता बळकावल्यानंतर तेथे दहशतवाद्यांना आश्रय देण्यात येऊ नये, असा इशारा देणारा ठराव भारताच्या पुढाकाराने संमत करण्यात आला.
भारताने ठराव क्रमांक १२६७ मांडला होता. तो भारतासाठी महत्त्वाचा ठरला होता.
भारताच्या अध्यक्षीय कारकिर्दीत सागरी सुरक्षेबाबतचाही ठराव मांडण्यात आला होता.
सुरक्षा मंडळात या विषयावर सविस्तर चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या वेळी प्रथमच अध्यक्षीय निवेदन प्रसारित करण्यात आले.

स्त्रोत : लोकसत्त