Get Mystery Box with random crypto!

माहिती उघड न करण्यामुळे पेगॅससचा वापर झाल्याचे स्पष्ट. पेग | CrackedSoft

माहिती उघड न करण्यामुळे पेगॅससचा वापर झाल्याचे स्पष्ट.

पेगॅसस प्रकरणात सरकारने सर्वोच्च न्यायालयात सुरक्षेच्या नावाखाली माहिती उघड करण्यास नकार दिला आहे. याचाच अर्थ ही पेगॅसस स्पायवेअर वापरल्याची कबुली देण्यात आली आहे. पेगॅससचाच वापर करण्यात आला का, व तो कशासाठी करण्यात आला, अशी विचारणा माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे.

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी असे सांगितले होते की, पेगॅसससारख्या स्पायवेअरचा वापर झाला की नाही यात राष्ट्रीय सुरक्षेचे अन्य प्रश्न आहेत, त्यामुळे आम्ही संवेदनशील माहिती उघड करू शकत नाही कारण देशाचे शत्रू असलेले देश व दहशतवादी कारवाया करणारे लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात.

चिदंबरम यांनी याबाबत असे म्हटले आहे की, सरकारला प्रतिज्ञापत्रात संवेदनशील माहिती उघड करता येणार नाही, असे सॉलिसिटर जनरल यांनी सांगितले. याचाच अर्थ पेगॅसस स्पायवेअरचा वापर करण्यात आला पण तो कशासाठी करण्यात आला याची माहिती आम्हाला हवी आहे. ते पेगॅसस स्पायवेअरच होते का, त्याचा वापर कशासाठी करण्यात आला, असे त्यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे. सरकारने या दोन प्रश्नांची उत्तरे दिली, तर बाकीच्या प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील असे त्यांनी स्पष्ट केले.