Get Mystery Box with random crypto!

करोना साथीतही भाविकांना कर्तारपूरला जाण्यास परवानगी. कर्ता | CrackedSoft

करोना साथीतही भाविकांना कर्तारपूरला जाण्यास परवानगी.

कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देण्यास पाकिस्तानने करोना साथ चालू असतानाही शीख भाविकांना परवानगी दिली आहे. कर्तारपूर तीर्थक्षेत्र खुले करण्याचा निर्णय नॅशनल कमांड अ‍ॅण्ड ऑपरेशन सेंटरने शनिवारी घेतला असून बाबा गुरू नानक देव यांची पुण्यतिथी २२ सप्टेंबरला असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘डॉन’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीत म्हटले आहे, की शीख भाविकांना पुढील महिन्यापासून कोविड नियम पाळून येथे भेट देण्यास परवानगी देण्यात आली आहे. डेल्टा विषाणूमुळे पाकिस्तानने भारताला क गटात टाकले असून २२ मे ते १२ ऑगस्ट या काळात हा धोका वर्तवण्यात आला होता. शीख भाविकांना परवानगी घ्यावी लागत होती. आता लस घेतलेले लोक त्यांचे प्रमाणपत्र दाखवून पाकिस्तानात प्रवेश करू शकतील.

आरटीपीसीआर चाचणीचे त्यांचे ७२ तासातील अहवाल तपासले जातील. याशिवाय रॅपिड अँटिजेन चाचणी विमानतळावर करण्यात आली असून कुणाला संसर्ग असल्याचे दिसून आल्यास पाकिस्तानात प्रवेश दिला जाणार नाही. दरबारमध्ये एकावेळी तीनशे लोकांनाच एकत्र येण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे राष्ट्रीय आरोग्य सेवेने म्हटले आहे.