Get Mystery Box with random crypto!

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष २७ एप्रिल इ.स.१६६३ छत्रप | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

२७ एप्रिल इ.स.१६६३
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६५८ साली उत्तर
कोकणवर स्वारी केली. तेव्हा पोर्तुगिजांच्या चौल आणि दमण ठाण्यांना मराठा सैनिकांकडून उपसर्ग पोचला. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६६१ साली दक्षिण कोकणवर स्वारी केली. त्यावेळी त्यांचे सैन्य गोव्याच्या हद्दीपर्यंत आले. शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाचा पराभव केल्यावर त्याचे अभिनंदन पोर्तुगिजांनी दिनांक २७ एप्रिल १६६३ च्या पत्राने केले. ही वेळपावेतो छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरकरांचे डिचोली आणि साखळी हे दोन प्रांत जिंकून घेतले, तेव्हा पोर्तुगिजांनी आपला वकील रामजी शेणवी यास अभिनंदनपर पत्र देऊन राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाठविले.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link
https://youtube.com/shorts/_1LMx4pYPpo?feature=share

२७ एप्रिल इ.स.१६६५
दाऊदखान किल्ले रोहिडा जवळ पोहचला. कुत्बुद्दीनखान व बलुदीखान (लोदीखान) हे अनुक्रमे जुन्नर तर्फ व तळकोकणात मिर्झाराजे जयसिंग यांच्या आज्ञेनूसार धुमाकूळ घालीत होतेच. आता जोडीला शव्वाल महिण्याच्या २१ तारखेस, म्हणजेच दि.२७एप्रिल इ.स.१६६५ दाऊदखानही किल्ले रोहिडा जवळ पोहचला आणि मोगली धुमाकूळाला चहू अंगांनी ऊत आला. किल्ले रोहिडा ते किल्ले राजगड या भागातील हिंदवी स्वराज्याची ५० खेडी मोगलांनी जाळून पार उद्ध्वस्त करून टाकली. त्या भागातील मराठे डोंगरातील खिंडीच्या आश्रयाने ४, चार खेड्यांत जमा झाले. मोगलांची एक तुकडी त्या भागात चालून गेली. पण मराठ्यांनी जबर झुंज मांडली. तेव्हा तिकडील मोगलांनी दाऊदखानाकडे अधिक कुमक पाठवा म्हणून कळविले. त्याप्रमाणे त्याने राजा रायसिंह व अचलसिंह कछवाह यांना फौजेसह पाठविले. ही फौज येत असलेली दिसताच मराठे डोंगरात निसटून गेलेत. मोगलांनी ही चार गावेही बेचिराख करून टाकली. तेथील गरीब प्रजा, गुरे-ढोरे व मालमत्ता मोगलांच्या हाती पडली. अनेक माणसे कैद झाली.



२७ एप्रिल इ.स.१६८०
(वैशाख शुद्ध नवमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार मंगळवार)

राजापुरकर इंग्रजांनी मुंबईकर इंग्रजांना लिहीलेल्या पत्राची नोंद !
"छत्रपती संभाजी महाराजांनी कारभार आपल्या हातात घेऊन राजपदवीही घेतली आहे. सुभेदार, हवालदार इ. आधिकारी लोकांना त्याने आपल्याकडे बोलावले. कित्येकांना कैद केले. कित्येकांना कामावरून दुर केले. छत्रपती संभाजी महाराजांचा नवा सुभेदार येथे आला. तेव्हा त्याला आम्ही जाऊन भेटलो. तेव्हा त्याने मोठ्या प्रेमाने व स्नेहाने आमची भेट घेतली"."



२७ एप्रिल इ.स.१६८०
(वैशाख शुद्ध नवमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार मंगळवार)

छत्रपती संभाजी महाराजांचे परिस्थितीवर संपूर्ण नियंत्रण आणि अण्णाजी दत्तो व मोरोपंत पेशवे अटकेत!
स्वराज्याचे वारसदार युवराज शंभुराजे यांना पकडण्यासाठी किल्ले रायगडला झालेल्या कटाचा सुगावा युवराज शंभुराजे यांना लागलेला होता. आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी शंभुराजे यांनी योग्य ती पावले टाकली. राजापुरास माणसे पाठवून धनधान्यांची तजवीज केली. रावजी पंडित यांस बोलावून कारवारच्या सर्व सुभेदारांना आर्थिक आय व्यय देण्यासाठी बोलावले संपूर्ण कारभार आपल्याच हाती घेऊन राजपदवी घेतली. सुभेदार, हवालदार, लष्करी अधिकारी व दस्तुरखुद्द सरलष्कर शंभुराजेंच्या बाजूने असल्याने शंभुराजेंनी बिनघोर पावले उचलली. याच सुमारास अण्णाजी दत्तो व मोरोपंत पेशवे यांनी जासुदांना पन्हाळ्याच्या आधिकारी यांना देण्यासाठी पत्रे पाठविली त्यांना आजच्या दिवशी अटक करण्यात आली. पुढे मात्र सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याकडून दस्तुरखुद्द अण्णाजी दत्तो व मोरोपंत पेशवे यांना अटक केली गेली.
https://youtube.com/shorts/_1LMx4pYPpo?feature=share


२७ एप्रिल इ.स.१६८३
गोव्याचा विजरई कोंट द आल्चोर सालसेट प्रांतातील सचोल या ठिकाणी गेला. तेथे त्याचे वास्तव्य २ महिने होते. जुन महिण्यात पाऊस सुरू झाला. पाऊस इतका पडला की, समुद्राप्रमाणे शेते भरून गेली. बाहेरून अन्नपुरवठा बंद पडला. लोक उपाशी मरू लागले. इ.स.१६८१ मध्ये कोंद दी आल्वोर हा गोव्याचे विजरईपदी विराजमान झाला. त्यावेळी गोव्यात पटकीची साथ होती. इ.स.१६८२ ला अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडला. आणि इ.स.१६८३ मध्ये त्याने आपल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे आक्रमण ओढवून घेतले. कोंट द आल्वोर हा अतिशय शूर योद्धा होता. स्पेनमधील अनेक लढ्यांत आघाडीवर होता. त्यास युद्ध मोहिमांचा चांगला अनुभव होता. गोव्यात हजर होण्यापूर्वी तो अंगोल्याचा गव्हर्नर होता.