Get Mystery Box with random crypto!

६ एप्रिल इ.स.१८१७ बाजीराव पेशव्याने (दुसरे) इंग्रजांशी लढाई क | " छञपती श्री शिवाजी महाराज "

६ एप्रिल इ.स.१८१७
बाजीराव पेशव्याने (दुसरे) इंग्रजांशी लढाई करण्याकरिता गुप्तपणे तयारी चालविली होती. त्याने आपल्याकडील जडजवाहर व खजिना रायगड किल्ल्यात सुरक्षिततेसाठी पाठवून दिला. दिनांक १ एप्रिल १८१७ रोजी एल्फिन्स्टनने बाजीरावास एक कडक पत्र लिहून कळविले की त्रिंबकजीचा पाठलाग जर झाला नाही तर इंग्रज सरकारला आपल्याशी जाहीररीत्या युद्ध पुकारावे लागेल व त्याच्या बऱ्या वाइटाचे धनी तुम्हीच व्हाल. दिनांक ६ एप्रिलला बाजीरावाने एल्फिन्स्टनला भेटीस बोलाविले व नेहमीच्या पद्धतीने याने लाचारी दाखवून लाघवी बोलून डेंगळेच्या बाबतीत आपण निरपराधी आहोत अशी बतावणी केली. एल्फिन्स्टनने त्यावर कठोरपणे सांगितले की एक महिन्याचे आत तुम्ही त्रिंबकजीस पकडून आणून आमचे स्वाधीन करा आणि तोपर्यन्त जामीन म्हणून तुमचे चार किल्ले रायगड, पुरंदर, सिंहगड व त्रिंबक आमचे ताब्यात द्या. या डरावणीने बाजीराव अगदी घाबरून गेला.



६ एप्रिल इ.स.१८४९
कोहिनूर आणि दुलीपसिंग यांची इंग्लंडला रवानगी
रणजितसिंग २७ जून १८३९ रोजी लाहोर इथे मरण पावला. त्याच्या वारसांमध्ये पण हाणामाऱ्या, कट, कारस्थाने होऊन त्याचा सगळ्यात धाकटा मुलगा दुलीपसिंग जो त्यावेळी ( सप्टेंबर १८४३ ) मध्ये अवघ्या पाच वर्षांचा होता, सिंहासनारूढ झाला. मार्च १८३९ मध्ये इंग्रजांनी अन्य भारतीय संस्थानांसारखे शीख साम्राज्य पण खालसा केले. त्यांनी ज्या प्रमाणे पेशवाईचा पाडाव झाल्यांनतर अल्पवयीन प्रतापसिंह महाराजांना नव्याने निर्माण केलेल्या सातारा राज्यावर बसवून( एप्रिल १८१८ ) त्यांच्या मार्गदर्शनासाठी कॅ.जेम्स ग्रांट ची नियुक्ती केली होती त्या प्रमाणेच दुलीपसिंगसाठी इंग्रजांनी डॉ. लोगिनला लाहोर दरबारी नियुक्त केले. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या हुकुमानुसार इंग्रजांनी कोहीनुरसहित रणजितसिंगाचा सर्व शाही खजिना ताब्यात घेतला. कोहिनूर घेऊन दस्तुरखुद्द डलहौसी मुंबईस आला व कोहिनूर आणि दुलीपसिंग ह्या दोघांची ६ एप्रिल १८४९ ला बोटीने इंग्लंडला रवानगी केली. ज्याप्रमाणे पुण्यश्लोक शाहू महाराज औरंगजेबच्या कुटुंबीयात राहिले होते तद्वतच दुलीपसिंग विक्टोरिया राणीच्या सहवासात बराच काळ राहिला. इ.स.१८५१ मध्ये ज्यावेळी त्याने कोहिनूर हिरा प्रथमच पाहिला होता, विक्टोरिया राणीस भेट म्हणून देऊन टाकला. तेहापासून कोहिनूर तेथील राण्यांच्या मुगुटामध्ये विराजमान आहे. कोहिनूर पुरुषांना लाभत नसल्याच्या भीतीने राजघराण्यातील पुरुष मंडळींनी तो कधी परिधान केला नाही.





६ एप्रिल इ.स.१९२७
सरफरोशी की तमन्ना
काकोरी दरोडा प्रकरणातील सर्व क्रांतिकारी दोन गाड्यांनी कोर्टात आणले गेले. ते देशभक्तीपर गाणी गात असत. घोषणा देत असत. लोकांची भरपूर गर्दी होत असे. ६ एप्रिल १९२७ रोजी ‘सरफरोशी की तमन्ना’ हे गाणे म्हणत सर्वजण कोर्टात शिरले. जस्टिस हॅमिल्टनने शिक्षा सुनावल्या. पंडीत रामप्रसाद ‘बिस्मिल’, राजेंद्र लाहिरी, ठाकूर रोशनसिंग, आणि अश्कफुल्ला खान ह्यांना फाशी झाली. अनेकांना जन्मठेप, १४-१०-७-५-४-३ वर्षांचे सश्रम कारावास झाले.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.