Get Mystery Box with random crypto!

५ एप्रिल इ.स.१७७८ महादजी शिंद्याचे छत्रपतींविरुद्ध आक्रमण आणि | " छञपती श्री शिवाजी महाराज "

५ एप्रिल इ.स.१७७८
महादजी शिंद्याचे छत्रपतींविरुद्ध आक्रमण आणि तह
कोल्हापूरच्या छत्रपतींचे पारिपत्य करण्यासाठी पेशव्यांनी त्यांचे सरदार महादजी शिंद्यास पाठवले. तीन महिने कोल्हापूरास वेढा पडला होता. अतोनात जिवीत व वित्तहानी झाली होती. त्यात महांकाळी तोफ कोल्हापूरात पोहोचल्यास तटबंदी टिकाव धरु शकणार नाही हे ओळखून सेनापती येसाजी शिंद्यांनी महादजीच्या अटीवर तह करण्याचे कबूल केले. ५ एप्रिल १७७८ रोजी तह झाला. तहानुसार छत्रपतींनी महादजीस वीस लाख रुपये खंडणी म्हणून द्यावे लागले व कोल्हापूरच्या फौजेने पकडलेली महादजीची माणसे सोडून द्यावी लागली.



५ एप्रिल इ.स.१८२२
सातारा राज्याचे छत्रपती प्रतापसिंह
एप्रिल १८१८ ला प्रतापसिंह यांची सातारा राज्याच्या गादीवर पुनःस्थापना झाली तरी त्यांचा बरोबर तह २५ सप्टेंबर १८१९ मध्ये झाला. कारण तोपर्यंत बाजीराव इंग्रजांना शरण आला नव्हता व त्याचा पूर्ण बंदोबस्त केल्यावरच इंग्रज सातारच्या महाराजांकडे लक्ष देणार होते. कंपनी सरकारतर्फे जेम्स ग्रांट तर महाराजांतर्फे त्यांचा मुखत्यार-पॉवर ऑफ अटर्नी-विठ्ठल बल्लाळ फडणीस ने सह्या केल्या. जेम्स ग्रांटने राज्यकारभाराच्या दृष्टीने परिपूर्ण सातारा राज्य ५ एप्रिल १८२२ महाराजांच्या हाती सोपविले. हे राज्य त्यानंतर सुमारे २६ वर्षे अस्तित्वात राहिले. ५ एप्रिल १८४८ ला आप्पासाहेबांच्या मृत्यूनंतर सातारा राज्य इंग्रजांनी खालसा केले.



५ एप्रिल इ.स.१८४८
छत्रपती आप्पासाहेब यांचा मृत्यू (सातारा गादी)
धाकटे शाहूमहाराज उर्फ आबासाहेब ह्यांना तीन मुलगे होते. सर्वात वडील प्रतापसिंह उर्फ बुवासाहेब, द्वितीय रामचंद्र उर्फ भाऊसाहेब आणि तृतीय अप्पासाहेब उर्फ शहाजी.
धाकटे शाहूमहाराज इ.स.१८०८ मध्ये मृत्यू पावल्या नंतर त्यांचा वडील मुलगा प्रतापसिंह छत्रपती बनला. ते इंग्रजांनी पदच्युत करेपर्यंत म्हणजे ५ सप्टेंबर १८३९ पर्यंत छत्रपतीपदी विराजमान राहिले. त्यांच्या नंतर अप्पासाहेब उर्फ शहाजी ह्यांना इंग्रजांनी १८ नोवेंबर १८३९ ला सातारा गादीवर बसवले. अप्पासाहेब ५ एप्रिल १८४८ रोजी मरण पावले. मृत्यूनंतर सातारा राज्य इंग्रजांनी खालसा केले.





५ एप्रिल इ.स.१८६३
छत्रपती चौथे शिवाजी महाराज कोल्हापूर संस्थान यांचा जन्म (करवीर राज्य)
दुसरे छत्रपती राजाराम महाराजांच्या अकाली निधनानंतर करविर गादीवर ८ वर्षाचे नारायण दिनकरराव भोसले अर्थात छत्रपती चौथे शिवाजी महाराज छत्रपती झाले. चौथे शिवाजी महाराजांचा जन्म कोल्हापुर येथील सावर्डे येथे ५ एप्रिल १८६३ रोजी झाला. (सावर्डेकर भोसले घराण्यातून दत्तक घेतलेले) महाराज उंचपुरे रुबाबद व्यक्तीमहत्व होते.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.