Get Mystery Box with random crypto!

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ४ एप्रिल इ.स.१६६३ (चैत्र | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

४ एप्रिल इ.स.१६६३
(चैत्र शुद्ध सप्तमी, शके १५८५, संवत्सर शोभन, वार शनिवार)

महाराजांची शाहिस्तेखानाला शास्त देण्याची तयारी!
महाराजांची महाराजांचा मुक्काम यावेळी किल्ले रायगडावर होता. तेथून ते किल्ले राजगडला परतले. सरनौबत नेतोजी राजगडी दाखल झालेले होतेच. मोरोपंत पेशवे व निळोपंत मुजुमदार किल्ले सिंहगडावर गेलेले होते. राजगडी पोहोचताच महाराजांनी निवडक मुत्सद्यांसमवेत विचार विनिमय करून प्रत्यक्ष शाहिस्तेखानावरच हल्ला करण्याचा आपला धाडशी बेत त्यांना सांगितला.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link
https://youtube.com/shorts/d4kQAv7bnmc?feature=share

४ एप्रिल इ.स.१६७०
नगरमध्ये मराठे घुसलेले पाहून 'दाऊदखान कुरेशी' हा खानदेशातून त्वरेने नगरास ७००० स्वारांसह आलेला होता.
नगरमध्ये घुसलेले मराठे आजच्या दिवशी जुन्नर प्रांतात पळाले. दाऊदखान त्यांच्यामागे हाथ धुवून पळत सुटला, जुन्नर प्रांतातूनही मराठे तात्पुरते पळून गेले. मग मात्र दमलेला दाऊदखान नगरला परतला.



४ एप्रिल इ.स.१६७२
निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू !
अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंतयोगी !!
दि. ४ एप्रिल १६७२ – चैत्र वद्य द्वितीया, शके १५९४ या दिवशी समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांना एक ओवीबद्ध पत्र पाठवले. “निश्चयाचा माहामेरू...” अश्या शब्दांनी सुरुवात होणारी आणि शिवरायांचे गुणसंकीर्तन करणारी ही शिवप्रशस्ती अलौकिक आहे. हे काव्य मोठे आहे पण त्यातील निवडक ओव्या गानकोकिळा लताबाई मंगेशकर यांनी आपल्या गोड गळ्याने गाऊन महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवल्या आहेत.
आजवर अनेक प्रतिभावंतांनी शिवरायांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. शिवरायांना समकालीन असलेल्या कविन्द्र परमानंद, कवि भूषण, केशवराज पंडित अश्या अनेकांनी शिवाजी महाराजांना आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या शब्दसामर्थ्याने गौरविले आहे. परंतु समर्थांनी, ‘निश्चयाचा माहामेरू’ या काव्यात शिवस्तुती करताना वापरलेल्या शब्दांची ऊंची कोणालाच गाठता आलेली नाही.



४ एप्रिल इ.स.१६७४
प्रतापराव रणांगणात पडले त्या दिवशी महाशिवरात्री होती.
प्रतापराव व बहलोलखान यांच्यात झालेल्या युद्धाचे वर्णन नारायण शेणवी (इंग्रजांचा दुभाशी) हा डेप्युटी गव्हर्नर, मुंबई यांना ४ एप्रिल १६७४ रोजी लिहीलेल्या पत्रात लिहीतात.
The Rajah Sevajee intended to proceed to currall to give a new orders to his army and to creat a New generall of his horse in the rooms of pertab roy (Pratap ray) Who fell in the encounter of Sevajees army with Bullool Ckaun in a narrow passage betwixt two hills who with six horse man more were slaine, being not succored by the rest of the army, so that Bullool ckaun remains victorius. (factory records of surat)
राजे शिवाजी यांनी आपल्या फौजेला आज्ञा देण्यासाठी व नविन सरनोबत नियुक्त करण्यासाठी कुडाळ येथे जाण्याचा निर्णय घेतला त्याचे कारण असे की, सरनोबत प्रतापराव हे बहलोलखानाशी झालेल्या चकमकीत मारले गेले. ही चकमक दोन टेकड्यांच्या मधे असलेल्या अरुंद ठिकाणी (खिंडीत - नेसरीची खिंड) झाली. प्रतापरावांसोबत आणखी सहा घोडेस्वार मारले गेले. प्रतापरावांना वेळेवर सैन्याची मदत न पोहोचू शकल्याने ह्या सर्वांची कत्तल झाली. लढाईमद्धे बहेलोल खान विजयी ठरला.
प्रतापराव बहलोलखानाशी फक्त ६ घोडेस्वारांनिशी लढताना बाकीच्या सैन्याचे अभावी मारला गेला. त्याचे जागी नविन सेनापती नेमून, सैन्याला नवे हुकूम देण्यासाठी शिवाजी कुडाळला जाणार होता. परंतु प्रतापरावाचा दुय्यम आनंदराव याने धीराचे पत्र लिहिल्यामुळे शिवाजीने त्याला सेनापती पद देऊन " शत्रूचा मोड केल्याशिवाय तोंड दाखवू नये." असा हुकूम केला.



४ एप्रिल इ.स.१६७४
एप्रिल ३ रोजी दुपारी शेणवी गडावर जाऊन दरबारांत शिवाजीराजे यांस भेटला. निताजीपंत हजर होते. राजापूरची वखारीची लुट केल्याने इंग्रजांचे जें नुकसान झालें, त्यावर प्रामुख्याने बोलणी झाली. यावेळी निराजीपंताने इंग्रजांच्या या मुद्दयावर अपेक्षेबाहेर तरफदारी केली. शिवरायांच्या मनावर निराजीपंतांच्या विचारांचा परिणाम होऊन त्यांनी ताबडतोब कारकुनास हुकुम लिहिण्यास सांगितले. राजापूरच्या नुकसानीची भरपाई शिवाजीराजे यांनी तीन हप्त्यांनी करावयाची. नुकसानीच्या रकमेदाखल २५०० होन राजापूरच्या जकातीतून; २५०० होन १ सप्टेबरपासून सुरु होणाऱ्या १ ल्या वर्षी व उरलेले एकूण ५ हजार होन शिवाजीराजे यांनी पुढील दोन वर्षांत इंग्रजांस पोहोचते होण्याची व्यवस्था करावी, असें या कलमाचे स्वरूप होते.