Get Mystery Box with random crypto!

आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ३१ मार्च इ.स.१६६५ ( चैत्र | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष

३१ मार्च इ.स.१६६५
( चैत्र वद्य दशमी, शके १५८७, संवत्सर विश्वासू, शुक्रवार )

दिलेरखानने पुरंदर गडाच्या पायथ्याशी तळ ठोकला
जयसिंगास ही बातमी समजताच त्याने दिलेरखानास मोगली फौजेची कुमक रवाना केली. पुरंदर व वज्रगड या दोन्ही किल्ल्यास वेढा घालण्यास फर्माविले. पुरंदरच्या पायथ्याशी आल्या आल्याच दिलेरखानाने गडावर हल्ला चढविला. गडावर मोगलाची फौज चालून आल्यावर किल्ल्यातील मराठ्यांनी हुशार राहून ह्या आपत्तीस तोंड देण्यासाठी ते सज्ज झाले. गडाच्या पायथ्यापासून नारायण पेठपर्यंत मोगली अफाट फौजेच्या चहूकडे राहुट्या, तंबू आणि शामियाने वरून दिसत होते. पुरंदरगड समुद्रसपाटीपासून ४५६४ फूट आणि पायथ्यापासून २५०० फूट उंच बालेकिल्ला. दुसरा भाग माची. याची उंची पायथ्यापासून २१०० फूट, बाले किल्ल्याला बळकट तटबंदी होती आणि मुख्य दरवाजा होता. तोच सर दरवाजा. गडाची राखणदारी करणारे प्रसिद्ध लढवय्ये होते आणि किल्लेदार होते प्रसिद्ध लढवय्ये मुरारबाजी. पुरंदरचा वेढा चालू असताना जयसिंगाने मोगल सैन्याच्या लहान मोठ्या फौजा रोहिडा, राजगड, तुंग, तिकोना ह्या किल्ल्याकडे पाठविल्या. त्या आसपासच्या मुलुखात स्वाऱ्या, जाळपोळ व लुटालूट करू लागल्या.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link





३१ मार्च इ.स.१६७६
शिवरायांचे जावळीचा देशाधिकारी आबाजी मोरदेव यास रामदासस्वामींबद्दल पत्र
दि. ३१ मार्च १६७६ रोजी, म्हणजेच राज्याभिषेकच्या दुसऱ्या शकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या जावळी प्रांताचा देशाधिकारी आबाजी मोरदेव याला आज्ञा केली. काय ? तर कसबे चाफळ येथील श्री रघुनाथाचे देवस्थान, कसबे नाणेघोळ आणि कसबे कराड येथील देवालये येथील नित्य पूजा आणि तिथल्या देवाच्या सेवकांना वेतन तसेच श्री रामदासस्वामी जिथे कुठे असतील, त्यांच्या सोबत जो शिष्यसमुदाय असेल त्यांच्यासाठी नुकतीच सनद सादर केली आहे (हि चाफळची जुनी, पहिली सनद होय). समर्थांच्या चाफळच्या देवस्थानाबद्दल, अन्नछत्र आणि भक्तसमुदायाकरिता प्रतिवर्षी ६० खंडी तांदूळ व ६१ खंडी नागली म्हणजे नाचणी देत जाणे असं म्हणून तिथल्या सुभेदारांना आज्ञा केली होती. श्री रामदासस्वामी शिवथर असता या सनदेप्रमाणे पावतच होते.



३१ मार्च इ.स.१६८३
(चैत्र शुद्ध चतुर्दशी, शके १६०५, संवत्सर रुधिरोद्रारी, वार शनिवार)

राहुल्लाखान बहादुरखानास मिळाला.
बहादुरखानाचा पराभव होतो आहे असे समजताच राहुल्लाखान बहादुरखानास मिळण्यास निघाले. राहुल्लाखान जवळ भरपूर सैन्य असल्याने त्याने पुर्ण अंदाज घेऊनच मराठ्यांवर हल्ला केला. मराठ्यांच्या गनिमी काव्यापुढे मोगली सैन्य टिकाव धरू शकत नसल्याचे कळल्यामुळे संतप्त बादशहाने राहुल्लाखास नाशिकला पाठविले. मात्र कल्याण-भिवंडीच्या मोहीमेत छत्रपती संभाजी महाराजांनी बादशहास मराठी बाण्याचे दर्शन घडवून बादशाही मोहीम झुगारून टाकून त्याचे मनसुबे उधळले.



३१ मार्च इ.स.१६८३
(चैत्र शुद्ध चतुर्दशी, शके १६०५, संवत्सर रुधिरोद्रारी, वार शनिवार)

पेडगावला मराठ्यांचा धुमाकूळ!
मोगल सेना औरंगजेबाच्या का होईना जागोजागी लढत होती. मराठ्यांनी तर यल्गारच मांडला होता. मराठे पेडगावात धुमाकूळ घालत पुढे चाल करून येत असल्याची बातमी मोगलांना मिळाली. मोगलांची फार वाताहात या युद्धात झाली सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा मोगलांना सराव नसल्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर आपला टिकाव लागत नाही याची जाणीव मोगल सरदारांना आता होत होती. अवघ्या ३ वर्षातच मोगलांना कळून चुकले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुढे आपला टिकाव लागणे कठीण आहे.





३१ मार्च इ.स.१६८६
(चैत्र वद्य द्वितीया, शके १६०८, संवत्सर क्षय, वार बुधवार)

इंग्रजांचे पत्र!
छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांचा कावा फार आधीच ओळखला होता. इंग्रजांचा सतत प्रयत्न होता की, त्यांचे चलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात चालावे, परंतु महाराजांनी सतत या प्रश्नाला बगल दिली. किमान छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात तरी आपले चलन रहावे याचा आटापिटा इंग्रज करीत होते. त्याचसाठी इंग्रजांचे जोरदार प्रयत्न सुरू होते. मुंबई व सुरतेला पत्रे आली, त्याचा मजकूर "मुंबईत आपली टांकसाळ असावी, छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यात आपले चलन चालावे याकरिता छत्रपती संभाजी महाराजांना गोड बोलून मदत करत रहावी". अशा आशयाचा होता. परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी या मुत्सद्देगिरीला केराची टोपली दाखवली. हे पत्र आजही इतिहासात उपलब्ध आहे याची नोंद घ्यावी.