Get Mystery Box with random crypto!

घटकराज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यातील तुलना (1) घटकराज्य | 📚 BALBHARATI E BOOK

घटकराज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यातील तुलना

(1) घटकराज्याचे केंद्रासोबतचे संबंध हे संघराज्यीय स्वरूपाचे आहेत.
कद्रशासित प्रदेशाचे केंद्राशी असलेले संबंध एकात्म स्वरूपाचे आहेत.

(2) घटकराज्य आणि केंद्र यांच्यामध्ये अधिकारांचे वाटप झालेले आहे.
याउलट, केंद्रशासित प्रदेशांवर थेट केंद्राचे नियंत्रण आणि प्रशासन असते.

(3) घटकराज्यांना स्वायत्तता असते.
कद्रशासित प्रदेशांना स्वायत्तता नसते..

(4) घटकराज्यांच्या प्रशासकीय संरचनेत एकसारखेपणा आढळतो.
कद्रशासित प्रदेशांची प्रशासकीय रचना भिन्न स्वरूपाची आहे.

(5) घटकराज्याच्या कार्यकारी प्रमुखाला राज्यपाल म्हणतात.
कद्रशासित प्रदेशांचा कार्यकारी प्रमुख विविध पदनामांनी ओळखला जातो. उदा. प्रशासक किंवा ले. गव्हर्नर किंवा मुख्य प्रशासक. इ.

Input by Samadhan Koakte sir
━━━━━━━━━━━━━