Get Mystery Box with random crypto!

गडचिरोली : राज्यात तलाठ्यांची ४ हजार ६४४ पदे भरण्याची जाहिरात | ATB Guruji

गडचिरोली : राज्यात तलाठ्यांची ४ हजार ६४४ पदे भरण्याची जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने नुकतीच प्रकाशित केली आहे. यात गडचिरोली जिल्ह्यात १५८ पदांपैकी पेसा क्षेत्रातून १५१ पदे व नॉन पेसा क्षेत्रातून ७ पदे भरण्याची जाहिरात आहे. यात ओबीसी, एस. सी., एन. टी. सह खुल्या प्रवर्गासाठी एकही जागा नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

पेसा क्षेत्रात वर्ग ३ व ४ ची १७ संवर्गातील पदे भरताना १०० टक्के अनुसूचित जमातीच्या उमेदवारातूनच भरण्याबाबतच्या ९ जून २०१४ च्या राज्यपालांच्या सूचनेत २९ ऑगस्ट २०१९ च्या अधिसूचनेनुसार सुधारणा करण्यात आली आहे. ती सुधारित अधिसूचना २८ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र राज्यात अंमलात आली आहे.