Get Mystery Box with random crypto!

● दादासाहेब फाळके - जन्म: 30 एप्रिल 1870 (त्र्यंबकेश्वर) - | VJS eStudy

दादासाहेब फाळके

- जन्म: 30 एप्रिल 1870 (त्र्यंबकेश्वर)
- मृत्यू: 16 फेब्रुवारी 1944 (नाशिक)
- पूर्ण नाव: धुंडिराज गोविंद फाळके
- 1885 ते 1890 मुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतले. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- ते चित्रपट निर्माते, रंगभूषाकार, नेपथ्यकार, छायाचित्रकार आणि ड्राफ्टमन अशी भूमिका पार पाडली.
- 1912 मध्ये राजा हरिश्चंद्र हा पहिला मुकपट काढला आणि भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली.
- श्रीकृष्ण जन्म, सेतूबंधन, कालियामर्दन, गंगावतरण इ. चित्रपट त्यांनी काढले.
- हरिश्चंद्राची फॅक्टरी हा फाळके यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 2009 मध्ये परेश मोकाशी यांनी काढला. (नंदू माधव यांनी फाळकेंची भूमिका साकारली)
------------------------------------------------
दादासाहेब फाळके पुरस्कार

- दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी विभागातर्फे 1969 पासून हा पुरस्कार दिला जातो
- भारतीय सिनेसृष्टीत असामान्य कामगिरी करणारे कलावंत व तंत्रज्ञानी यांना दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार
- सुवर्णकमळ, 10 लाख रूपये आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- 1969 चा पहिला पुरस्कार अभिनेत्री देविकाराणी यांना देण्यात आला. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- 2019 चा पुरस्कार अभिनेते अमिताभ बच्चन यांना देण्यात आला.
- 2020 चा पुरस्कार अभिनेते रजनीकांत यांना देण्यात आला.

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta