Get Mystery Box with random crypto!

एअर मार्शल विवेक राम चौधरी भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख असतील. | VJS eStudy

एअर मार्शल विवेक राम चौधरी भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख असतील. व्ही आर चौधरी या महिन्याच्या अखेरीस पदभार स्वीकारतील.भारतीय हवाई दलाचे ते आता उपप्रमुख आहेत. सध्याचे हवाईदल प्रमुख, एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर चौधरी त्यांची जागा घेतील. हवाई दलाचे उपप्रमुख चौधरी यांनी राफेल विमानांच्या खरेदी संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावली होती. फ्रान्समधील लढाऊ राफेल विमान प्रकल्पाच्या खरेदी प्रकल्पात लक्ष ठेवणाऱ्या द्विपक्षीय उच्चस्तरीय गटाचे ते प्रमुख होते.

Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta