Get Mystery Box with random crypto!

● भारताच्या सरन्यायाधीशांबाबत तथ्ये - आजपर्यंत एकही महिला भा | VJS eStudy

● भारताच्या सरन्यायाधीशांबाबत तथ्ये

- आजपर्यंत एकही महिला भारताची सरन्यायाधीश झाली नाही.
- सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश न्या. हरिलाल जेकिसुंदास कानिया यांचा कार्यकाल 1 वर्षे 284 दिवस एवढा होता
- सर्वाधिक काळ सरन्यायाधीश राहिलेले व्यक्ती: 16 वे सरन्यायाधीश न्या. वाय. व्ही. चंद्रचूड सात वर्षे 139 दिवस पदावर होते.
- सर्वात कमी काळ सरन्यायाधीश राहिलेले व्यक्ती: 22 वे सरन्यायाधीश न्या. के. एन. सिंग फक्त 17 दिवस पदावर होते. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- राजेंद्र प्रसाद, डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि प्रणब मुखर्जी हे राष्ट्रपती पदावर असताना प्रत्येकांनी 6 सरन्यायाधीशांना शपथ दिली आहे.
- राष्ट्रपती म्हणून पदभार सांभाळलेले एकमेव सरन्यायाधीश न्या. एम. हिदायतुल्ला (भारताचे 11 वे सरन्यायाधीश होते). हे असे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांनी सरन्यायाधीश, राष्ट्रपती आणि उप राष्ट्रपती या तिन्ही पदे सांभाळली आहेत.
- पदावर असताना मृत्यू पावलेले सरन्यायाधीश: पहिले सरन्यायाधीश न्या. हरिलाल जेकिसुंदास कानिया आणि 20 वे सरन्यायाधीश सभ्यसाची मुखर्जी. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- राजीनामा देणारे सरन्यायाधीश: 4 थे सरन्यायाधीश बीजन कुमार मुखर्जीया, 9 वे सरन्यायाधीश न्या. के. सुब्बा राव आणि 18 वे सरन्यायाधीश न्या. आर. एस. पाठक.

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta