Get Mystery Box with random crypto!

#vvimp #mpsc नवीन हत्यार नोकरीतून उठणार अन नोकरीला मुकणा | सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊

#vvimp #mpsc

नवीन हत्यार
नोकरीतून उठणार अन नोकरीला मुकणार

#JusticeForTypingCertificateCandidates
2/3 मिनिटे वेळ काढून वाचाच... लय महत्त्वाचे आहे
ज्यांना serious घ्यायचं नाही त्यांनी घेऊ नका आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा घरी बसा

जे उमेदवार येणाऱ्या गट क मधील clerk आणि किंवा TAX व इतर सरळसेवा परीक्षांसाठी तयार असतील त्यांना 1 महत्वाची माहिती...Alert

नुकतीच काही बनावट प्रमाणपत्र सादर केलेल्या वर्ग अ ते ड पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे आणि ते सध्या त्या रस्त्यावरून चालत आहेत..जर त्यांचे सोबती तुम्ही होणार नसाल तर खालील गोष्टी नीट समजून घेऊन कानाला चिमटा काढा आणि म्हणा आताच शहाणा होतो/होती...

1. ज्यांच्याकडे duplicate मराठी/English Typing Certificate असतील त्यांनी येणाऱ्या जाहिरातीसाठी परीक्षा form भरण्याच्या नादात पडू नये. भरला असल्यास mains देऊ नका.

2. ज्यांनी आता सध्या duplicate certificate काढण्यासाठी पैसे देऊन ठेवलेत त्यांनी ते परत घ्या किंवा स्वतःला शिक्षा म्हणून सोडून द्या.

3. ज्यांनी आपल्या mpsc प्रोफाइल वर duplicate certificate ची माहिती अद्ययावत केली आहे त्यांनी ती delete करावी, कारण तुम्ही परीक्षा द्यायच्या आधीच black list मध्ये जाऊ शकता. (न कळत चौकशी समजून पण येणार नाही)

4. सुरक्षितता म्हणून ज्यांनी ज्यांनी duplicate certificate स्वतः बाळगली असतील , त्यांनी ती तात्काळ फाडून टाका.

5. सध्या जो/जी कोणी duplicate certificate काढण्याच्या तयारीत असतील त्यांनी ती प्रक्रिया निमूटपणे थांबवावी, नाहीतर असं व्हायचं की हातात certificate मिळायचं अन mpsc कडून black list मध्ये नाव ही जाहीर व्हायचं, हे दोन्ही सोबत होण्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होऊ नका.खरंच...

6. तुम्ही म्हणाल आम्ही लय hifi पद्धतीने certificate मिळवले/मिळवू पण certificate पडताळणी करणारे तुमच्या कित्येक पट पुढचे असतात हे तुम्हाला प्रशासनात आल्याशिवाय समजणार नाही. CID मालिका बघताना कसे वाटते? त्यापद्धतीने धागेदोरे शोधले जातात जे तुम्ही Already लपवलेले असतात पण ते लपलेले नसतात म्हणूनच तुम्ही त्यांना माहिती असता बनावटी आहात म्हणून...

7. नोकरी लागल्यावर घरी, गावाकडे, समाजात खूप गाजावाजा केलेला / झालेला असतो आणि कामावरून काढून टाकले जाते आणि जेव्हा आपण वर्षानुवर्षे घरीच दिसू लागतो ना? तेव्हा आपली तोतयागिरी लक्षात येते, खोटे बोलून प्रतिष्ठा परत मिळत नसते मग तेव्हा काय ऐकून घ्यावे लागेल? जे नोकरी लागण्यापूर्वी सुद्धा ऐकले नसेल.

8. आता तुम्ही म्हणाल याआधी कितीतरी duplicate certificate सादर करून नोकरी करत आहेत मग त्यांचं काय? तर त्यांचं जे काय होणार आहे ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहणार आहात, त्यात काहीच वाद नाही...(पाण्यातील बुडबुडा वर यायचा राहत नाही)

म्हणून मित्रहो कोणाच्या तरी सांगण्यावरून असली तोतयागिरी करू नका याचे नुकसान कधीही भरून निघणार नाही...

आपल्या परिचित duplicate certificate धारकांना हा msg forword करून जागे करा

प्रामाणिक उमेदवारांचे चांगले दिवस येणार आहेत तुम्ही फक्त बनावट लोकांपर्यंत msg forward करा. आणि त्यांनाही गुन्हा करण्यापासून रोखा...

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं।

@maha_spardha