Get Mystery Box with random crypto!

थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीची प्रवेश (Engineering Admission) | नवीन नोकरी 💯 Royal Engineer 🔥

थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीची प्रवेश (Engineering Admission) फेरी सुरु झाली आहे. तर प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाची दुसरी फेरी सोमवारपासून (ता. 13) सुरू होत आहे. तर द्वितीय वर्षासाठी 13 डिसेंबरपर्यंत आणि प्रथम वर्षासाठी 13 ते 15 डिसेंबरपर्यंत ऑप्शन (Option) निवडता येणार आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र (Certificate of Validity), नॉन क्रिमीलेअर (Non-crimilayer)व ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र (EWS certificate) नसल्याने त्या विद्यार्थ्यांना प्रवेश (open Admission)घ्यावा लागणार आहे. प्रवेश नियामक प्राधिकरणाने त्यासंदर्भातील नियमावली जाहीर केली आहे.

अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी (Registration) करताना जात वैधता प्रमाणपत्र(Certificate of Validity), नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Non-crimilayer)आणि ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राची (EWS certificate) पावती अपलोड केली आहे, त्यांनी ती कागदपत्रे दुसऱ्या फेरीच्या रिपोर्टिंगवेळी देणे बंधनकारक आहे. प्रवेशाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कागदपत्रे (Documents) मिळत नसतील, त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीचा ऑप्शन फॉर्म (Option form)भरताना खुल्या प्रवर्गात रूपांतर केले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रथम फेरीत पावती जोडल्याने त्या प्रवर्गाची जागा मिळाली असेल व त्यांना हे प्रमाणपत्र मिळणार नसेल, त्यांनीही दुसऱ्या फेरीत खुल्या प्रवर्गात रूपांतर करून विकल्प भरण्याची संधी (Opportunity) देण्यात आली आहे. अशा विद्यार्थ्यांना प्रथम फेरीत मिळालेले अलॉटमेंट रद्द होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांनी ऑप्शन निवडताना अचूक पर्याय निवडावा, असे आवाहन प्रवेश नियामक प्राधिकरणाने केले आहे.वेगवेगळ्या प्रमाणपत्राची पावती अपलोड करून त्या प्रवर्गामध्ये अलॉटमेंट मिळाल्यास दुसऱ्या फेरीतील रिपोर्टिंगच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुळ प्रमाणपत्रे संबंधित महाविद्यालयात सादर करणे अनिवार्य आहे. अन्यथा अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होतील.

व्हॅलिडीटीनंतर मिळेल शिष्यवृत्ती (Scholarship will be given after validity)
प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रे (Documents) मिळणार आहेत म्हणून त्यांच्या प्रवर्गातून अर्ज केला आहे, त्यांनी कागदपत्रे नसतील तर खुल्या प्रवर्गाचा पर्याय निवडावा. अन्यथा प्रवेश निश्‍चित झाल्यानंतर कागदपत्रे न दिल्यास त्या विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होणार आहे. दुसरीकडे जात वैधता प्रमाणपत्र (Certificate of Validity)मिळाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजकडे ते दिल्यानंतर त्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.