Get Mystery Box with random crypto!

II ओ३म् II तमसो मा ज्योतिर्गमय *द.भै.फ. दयानंद कला व शास्त्र म | Dayanand Junior College [Official]

II ओ३म् II
तमसो मा ज्योतिर्गमय
*द.भै.फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर*

*राज्यशास्त्र विभाग व निवडणूक साक्षरता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने*

*राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध स्पर्धा*


महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, २५ जानेवारी २०२२ रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या औचित्याने विद्यार्थ्यांमध्ये मताधिकार व लोकशाही या विषयासंबंधी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी राज्यशास्त्र विभाग व निवडणूक साक्षरता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धांचे आभासी (ऑनलाईन) पद्धतीने आयोजन करण्यात आलेले आहे. तरी विद्यार्थ्यांनी दिनांक ०७ जानेवारी २०२२ ते २४ जानेवारी २०२२ सायंकाळी ५ वाजेपर्यंत खाली दिलेल्या लिंकच्या सहाय्याने विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे.

*स्पर्धेची लिंक :* https://forms.gle/zLntw8xotQWTYDTe8

*स्पर्धेचे विषय :*

पोस्टर आणि चित्रकला :

१) १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन
२) स्रियांना मतदार नोंदणीचे आवाहन
३) अपंगांच्या मताधिकाराचे महत्व आणि आवाहन
४) तृतीय पंथीयांचे मताधिकाराचे महत्व आणि आवाहन

घोषवाक्य :

१) सर्वोत्कृष्ट शासनपद्धती : लोकशाही
२) १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन
३) मताधिकाराचे महत्व

रांगोळी :

१) एका बोटावरच्या शाईची किंमत
२) मताधिकाराचे महत्व
३) स्रियांना मतदार नोंदणीचे आवाहन
४) १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन

मीम :

१) निवडणुकीच्या दिवशी फिरायला जाणारे लोक
२) सगळी व्यवस्था भ्रष्ट आहे असे समजून मताधिकार न बजावणारे लोक
३) मतदार नोंदणी न करणारे लोक
४)अठराव्या वर्षाची जबाबदारी – मतदार नोंदणी
५) माझ्या महाविद्यालयातील १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवांनी मतदार नोंदणी करावी म्हणून

*टीप : वरील सर्व स्पर्धांमध्ये आपले मत व्यक्त करीत असताना लोकशाहीचा सन्मान आणि सांविधानिक भाषेचा वापर करणे बंधनकारक आहे, आपल्या भाषेमूळे अथवा वक्तव्यामुळे कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि पक्ष यांची बदनामी होणार नाही किंवा वैयक्तिक द्वेषापोटी त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचणार नाही याची सर्व स्पर्धकांनी दक्षता घ्यावी, असे आढळल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.*

प्रा. डॉ. व्ही. पी. उबाळे
प्राचार्य

सौ. एम. ए. पत्की
राज्यशास्त्र विभागप्रमुखा तथा
नोडल ऑफिसर, निवडणूक साक्षरता मंडळ