Get Mystery Box with random crypto!

|| ओ३म् || तमसो मा ज्योतिर्गमय दयानंद कला व शास्त्र महाविद्या | Dayanand Junior College [Official]

|| ओ३म् ||
तमसो मा ज्योतिर्गमय
दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर

MHT-CET(2021) राज्य परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन..

2021 मधे घेण्यात आलेल्या राज्य MHT-CET परीक्षेत दयानंद कला व शास्त्र (कनिष्ठ) महाविद्यालयातील विद्यार्थी श्री तेली चंद्रशेखर चिदानंद 99.57(PCB) पर्सेनटाईल गुण मिळवून महाविद्यालयात सर्वप्रथम आला,तर याच महाविद्यालयाचा विद्यार्थी श्री सिद्धांत हरी मुंढे हा 99.33(PCM) पर्सेनटाईल गुण मिळवून महाविद्यालयात दुसरा आला.याचबरोबर धोत्रे दिव्या 98.68, घम निशिता 97.51, बागवान कशिश 94.54,कलशेट्टी वैभवी 94.31, भोंगे सृष्टी 93.74 व तेली मनोज 93.73 (सर्व PCB ग्रुप) तसेच साखरे राज 97.84, चितारी अनुज 94.56 व वाघमारे तुषार 90.02(सर्व PCM) या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानिय सचिव श्री.महेशजी चोप्रा, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार उबाळे, उपप्राचार्य श्री. अरुण खांडेकर, पर्यवेक्षक श्री. विजय बिराजदार, समन्वयक श्री माधव कुलकर्णी व सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक
28/10/2021