Get Mystery Box with random crypto!

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष २५ ऑगस्ट इ.स.१६२९ जाधवरा | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

२५ ऑगस्ट इ.स.१६२९
जाधवरावांसारखे मातबर सरदारांचा बंदोबस्त निजामशहाने करावा असा गुप्त सल्ला जाधवरावांच्या विरुद्ध असलेल्या सरदारांनी निजामशहास दिला. असे होऊ नये म्हणून निजामशहाने त्यांना पकडून अटकेत ठेवण्याचा विचार केला. जाधव मंडळीस त्याने दौलताबादचे किल्ल्यावर दिनांक २५ ऑगस्ट १६२९ रोजी भेटीस बोलाविले. त्यास पकडीत असता विलक्षण दंगल माजली, तीत खुद्द लखूजी जाधवराव, त्यांचे दोघे पुत्र अवलोजी आणि राघोजी व नातू यशवंतराव इतके पुरुष मारले गेले. लखूजीची बायको गिरजाबाई, भाऊ जगदेवराव व मुलगा बहादूरजी एवढे बचावून सिंदरखेडच्या गढींत आश्रयास गेले. बादशहा शहाजनास हा प्रकार कळल्यावर त्याने ह्या जाधव मंडळीस नोकरींत घेऊन मनसबी ठरवून दिल्या. आपल्या सासऱ्याचा दग्याने खून केलेला पाहून निजामशाहीत यापुढे राहणे धोक्याचे आहे तसेच आपल्याला निजामशाहीत परत आणण्याचा जो प्रयत्न झाला त्यांत काहीतरी कुटील कारस्थानाचा भाग असला पाहिजे असा शहाजीराजांचा समज झाला.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

२५ ऑगस्ट इ.स.१६६५
व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेले इंग्रज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत दुटप्पीपणे वागत होते.महाराजांच्या विरोधात ते सिद्दी, मोगल आणि अदिलशाहीला छुपी मदत करत असत.प्रगत इंग्रजांच्याकडे लांब पल्ल्याच्या तोफा व आधुनिक शस्त्रे होती. पण असे असले तरी महाराजांच्या पुढे त्यांची मात्रा चालत नसे. महाराजांच्या स्वारीवेळी त्यांना सुरक्षित आसरा शोधावा लागे. प्रसंग होता शिवाजी महाराजांच्या पहिल्या नौका रोहणाचा(८ फेब्रुवारी १६६५)आणि त्याद्वारे बसरूर आणि कारवार वर केलेल्या स्वारीचा.महाराज ५ ते ६ दिवसांचा समुद्रप्रवास करून १३ किंवा १४ फेब्रुवारी ला बसरूरला आले होते.महाराजांच्या स्वारीच्या भीतीने हुबळी आणि कारवारलाही घबराट पसरली होती. तेथील इंग्रजानी महाराजांच्या भीतीने शेरखानाकडे आश्रय मागितला होता. त्या परिस्थितीत कारवारच्या इंग्रजानी सुरतेला पत्र पाठवले होते,"अश्या परिस्थितीमुळे आम्ही बकांपुरचा सुभेदार शेरखान कडून परवानापत्र घेऊन ठेवले आहे,जेणेकरून वेळ पडली तर तेथे आम्हला जाता येईल,मालक बहलोलखान होता."



२५ ऑगस्ट इ.स.१६७४
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक समारंभानंतर अवघ्या काहीच दिवसात पाचाड मुक्कामी जिजाऊंच्या झालेल्या निधनाने फक्त महाराजच नव्हे तर अवघा मुलुख उदास झाला होता.असे असले तरी महाराज आपले दुःख बाजूला सारून स्वराज्याचाच विचार करत होते.याच काळात फोंडयाचा आदिलशाही सुभेदार महंमदखान स्वराज्याच्या हद्दीत येऊन कुरापती काढत होता.त्याने स्वराज्यातील गावातून एका श्रीमंत व्यापाऱ्याला कैद करून नेले होते. महाराजाना ही बातमी समजताच ते संतप्त झाले. महाराजांच्या रागावल्याची गोष्ट कळताच महमदखान घाबरला.महाराजांच्या स्वारीच्या धाकाने त्याने इंग्रजांकडून दारुगोळा व तोफा मागवल्या.पण महाराजांच्या भीतीने इंग्रजानी नकार दिला. चिडलेल्या महाराजांनी अण्णाजीपंताना सैन्य देऊन फोंडयावर रवाना केले.पण अनपेक्षितपणे ही बातमी खानाला समजली.तो सावध राहिल्याने अण्णाजीपंताना अपयश आले. आण्णाजीपंताना महाराजानी फोंडा किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी पाठवले होते ते ऑगस्ट च्या शेवटच्या आठवड्यात.



२५ ऑगस्ट इ.स.१६७६
सण १६७ च्या नारळी पौर्णिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा मोहीम हाती घेण्याचे ठरवले.त्यासाठी महाराजानी स्वराज्याचे पेशवे मोरोपंत यांना 10 हजार फौज देऊन जंजिऱ्यावर पाठवले.सिद्दी यावेळी सुरतेत होता.मोरोपंत निघाल्याचे कळताच तोही आपल्या सैन्यासह जंजिऱ्याकडे निघाला.मोरोपंतांनी बरेच प्रयत्न केले पण यश मिळत नव्हते.त्यांनी एक दिवस पद्मदुर्गावर असणाऱ्या सोनकोळी लोकांना बोलवून त्यांचा प्रमुख लाय पाटील यांना जंजिरा मोहिमेत मदत करण्यास सांगितले.लाय पाटलांनी होकार देताच त्यांना अंधाऱ्या रात्री जंजिऱ्याच्या तटाला शिड्या लावण्याची कामगिरी देण्यात आली.ठरलेल्या दिवशी लाय पाटलांनी आपली जबाबदारी पार पाडली पण पहाट होत आली तरी मोरोपंत आले नाहीत त्यामुळे लाय पाटील परत गेले.मोहीम अपयशी झाली.मोरोपंतांनी रायगडी जाताच लाय पाटलांचा पराक्रम महाराजाना सांगितला.महाराजानी त्यांना पराक्रमाबद्दल छत्री,निशाण आणि पालखी देऊ केली पण पाटलांनी ती नाकारल्याने त्यांना पालखी नावाचे गलबत बांधून दिले.त्याचबरोबर महाराजानी पद्मदुर्गाच्या हवालदार,सरनौबत यांचाही सन्मान केला.पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा.