Get Mystery Box with random crypto!

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ९ ऑगस्ट इ.स.१६५४ (श्रावण | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

९ ऑगस्ट इ.स.१६५४
(श्रावण पोर्णिमा, शके १५७२, संवत्सर नंदन, वार सोमवार)

महाराजांनी निळोजीपंत महादजी सरनाईक यांस इमानपत्र दिले.
मार्च १६५४ मध्ये किल्ले पुरंदरचे महादजी निलकंठराव सरनाईक मृत्यू पावले.ही बातमी शिवाजी महाराजांनी शहाजीराजेना कळवली.शहाजीराजेनी यावर महादजींच्या चारही पुत्रांना सांत्वनाचे पत्र पाठवले होते.या दुःखद प्रसंगी शिवाजी महाराजांनीही महादजींचे वडील पुत्र निळोपंत याना स्वतंत्र पत्र पाठवले होते. ते असे,"जैसे काही राऊ गोसावी(महादजीपंत)आम्हांसी वर्तत होते तैसेंच तुम्हीही आम्हांसी वर्तत जाणे व आम्ही जैसे काही राजश्री राऊगोसावी याचे चालवीत होतो तैसेच तुमचेही चालवून.एविशई आम्हास श्रींची व राजेश्री महाराज साहेबाच्या पायाची व सौभाग्यवती मातूश्रीसाहेबांच्या पायची आण असे.व येविशई श्रींचा दवणा पाठविला असे तो घेणे व जोपर्यंत तुम्ही आम्हासी इमाने वर्तल तोपर्यंत आम्हीही तुम्हांसी इमाने वर्तीन. तुम्हापासोन इमानात अंतर पडलिया आमचाही इमान नाही."


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

९ आगस्ट इ.स.१६७६
(श्रावण शुद्ध एकादशी, शके १५९८, संवत्सर नल, वार बुधवार)

मोरोपंत पिंगळे दंडाराजपुरीस!
मोरोपंत पिंगळे दंडाराजपुरीस १० हजार फौज घेऊन काबीज करण्यासाठी निघाले. तोफांचा मारा होण्यास अडचण येऊ म्हणून किनाऱ्याभोतीची झाडे तोडून तसेच होड्यांवर आवश्यक तेवढा तोफगोळा घेऊन जय्यत तयारी करून मोरोपंत पिंगळे दंडाराजपुरीस आले.



९ ऑगस्ट इ.स.१६८८
१६८८ सालातल्या जुलै महिन्याच्या शेवटी सैय्यद अब्दुल्ला खान (नंतरच्या काळात दिल्लीच्या राजकारणात प्रसिद्ध असलेल्या सैय्यद बंधूंचा बाप) याने आपला मुलगा हसनअलीखान याला सैन्य देऊन बागलाणातील होलगड किल्ला जिंकण्यासाठी पाठवले होते. होलगडाच्या मराठी किल्लेदाराने हसन अलिखानाच्या सैन्याशी चिवट झुंज दिली. पण संख्येने अधिक असणाऱ्या मुघल सैन्यापुढे त्याचा निभाव लागला नाही. मुघलांनी हा किल्ला जिंकल्यावर सैय्यद अब्दुल्लाखानाने होलगडाच्या किल्ल्याची सोन्याची किल्ली बादशहा औरंगजेबाकडे पाठवून दिली.



९ ऑगस्ट इ.स.१७८०
दक्षिणेत हैदरअलीखानाने मोठाच उपद्रव मांडला होता. इकडे इंग्रजही युद्धाच्याच तयारीत होते. एकाच वेळी या दोन्ही शत्रूशी लढणे हे सध्या तरी आपल्याला शक्य नसल्याचे नाना-महादजींनी ओळखले. तिकडे निजामही इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करत होताच. म्हणून मग नानांनी नागपूरकर भोसल्यांचे मन वळवून हैदरअलीशी इंग्रजांविरोधात तहाच्या वाटाघाटी सुरू केल्या. शेवटी दि. २० फेब्रुवारी १७८० रोजी पेशवे आणि हैदरअली यांच्यात तह झाला. त्या तहाची काही कलमे तयार केली गेली. शेवटी दि. ९ ऑगस्ट १७८० रोजी हा तह कायम करण्यात आला. त्यामुळे आता ब्रिटिशांच्या विरोधात श्रीमंत पेशवे, नागपूरकर भोसले, हैद्राबादकर निजाम आणि म्हैसुरचा हैदरअली ही चौकडी एकत्र आली. पेशव्यांनी पश्चिम, भोसल्यांनी उत्तर, निजामाने पूर्व तर हैदराने दक्षिण दिशेला कामगिरी करावी, असे ठरले.



९ ऑगस्ट इ.स.१९२५
९ ऑगस्ट भारतीय क्रांतिदिन
भारतीय स्वातंत्र्यलढा – क्रांतिकारकांनी लखनौजवळ काकोरी येथे रेल्वेवर दरोडा टाकला इंग्रजाना देशाबाहेर घालवण्‍यासाठी चंद्रशखेर आजाद आणि त्‍यांच्‍या सहका-यांनी काकोरीजवळ रेल्‍वे लुटली. ९ ऑगस्‍ट १९२५ काकोरी कट म्‍हणून ओळखले जाते. काकोरी कटामध्‍ये सहभागी झालेल्‍या सर्वच क्रांतिकारकांना पकडण्‍यात आले. यापैकी क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, अशफाक उल्‍लाह खॉं आणि राजेंद्र प्रसाद लाहिडी यांना १९ डिसेंबर १९२७ मध्‍ये फासी देण्‍यात आली.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"