Get Mystery Box with random crypto!

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ४ ऑगस्ट इ.स.१६६८ (श्रावण | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष

४ ऑगस्ट इ.स.१६६८
(श्रावण शुद्ध ७, सप्तमी, शके १५९०, संवत्सर किलक, वार मंगळवार)

शिवरायांनी कोकणातील जैतापूर जिंकले.
शिवरायांनी आग्रा येथून सुटका करून घेतल्यानंतर मोगलांशी तह केला व आपले लक्ष पोर्तुगीज राज्यावर केंद्रीत केले. धर्मांध पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी महाराजांनी आपली मोहिम‌ उघडली व त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूरवर हल्ला करून ते जिंकुन घेतले.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

४ ऑगस्ट इ.स.१६८१
दुटप्पी धोरणाने वागणाऱ्या इंग्रजांच्या सहकार्याने मुंबईत आणि लगतच्या उंदेरी किल्ल्यावर राहून मराठी मुलखात नासधुस व लुटालूट करत असे.उंदेरी किल्ला सिद्दीकडून घेतला आणि मुंबईतही त्याला थारा मिळाला नाही तर सिद्दीच्या हालचालींना पायबंद बसेल असे संभाजीराजेना वाटत होते. त्यामुळे सिद्दीकडून उंदेरी घ्यायचे असे राजांच्या मनात पूर्वीपासून घोळत होते.त्यादृष्टीने त्यांनी ऑगस्ट १६८० मध्ये तसा प्रयत्न केला होता पण तो फसला गेला.पण संभाजीराजेनी हार मानली नाही,त्यांच्या आदेशाने मराठ्यांनी पुन्हा एकदा उंदेरीवर हल्ला चढवला होता.याबाबत इंग्रजांची नोंद अशी होती,"मराठ्यांनी दि.१८ जुलै १६८१ ला पहाटे उंदेरीवर हल्ला चढवला. मराठे आणि सिद्दी सतत ४ तास एकमेकांवर हल्ले करत होते. त्यात काही माणसे मेली व पुष्कळ पकडली गेली.अखेर सिद्दीने हा हल्ला परतवून लावला."



४ ऑगस्ट इ.स.१६८७
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणेच शंभुराजेंना सुध्दा आपल्या लष्करात शिस्त असणे अपेक्षीत होते.आपल्या लष्करी अधिकाऱ्यांनी रयतेला किंवा देवस्थानांना त्रास दिलेला त्यांना खपत नसे.पुणे प्रांतातील मौजे चिंचवड हा गाव श्री देव यांच्याकडे चालत असे. महाराजांच्या लष्करातील सुभेदार,जुमलेदार,हवालदार, हशम यांच्याकडून या देवस्थानाला उपद्रव होत असे.मन मानेल तशी वसुली हे अधिकारी करत असत.त्यामुळे शंभुराजेंनी त्यांना आज्ञा केली की,"असे असता तुम्ही रहदारीस नाहक दरफ्ती करता,उपद्रव देऊन धामधूमही करता.रयतीकडून गैरसनदी मनास येईल ते मागत होता म्हणोन कळो आले.तरी हे ढंग स्वामिस कैसे मानो पाहतात?या उपरी ही बदराहा वर्तणूक केलीया तुमचा एकंदर मुलाहिजा होणार नाही.जो धामधूम करील त्यास स्वामी जिवेच मारतील. हे जाणून मौजे मजकुरास तसदी ना देणे.ताकीद असे."शंभुराजेंच्या या एकमेव पत्रात स्वामी जिवेच मारतील हा दम दिलेला आढळतो.



४ ऑगस्ट इ.स.१७३०
(भाद्रपद शुद्ध द्वितीया शालिवाहन शक १६५२, साधारणनाम संवत्सर)

भाऊसाहेब अर्थात सदाशिवरावांचा जन्म.
चिमाजीअप्पांना पहिलाच पुत्र झाला. शनिवारवाड्यावर चौघडा वाजू लागला. पुण्यात साखरा वाटल्या गेल्या. सदाशिवचा जन्म झाल्यानंतर त्यांची आई रखमाबाईंची तब्येत ढासळली. औषधोपचार चालु झाले मात्र त्याचा उपयोग न होऊन ३१ ऑगस्ट १७३० रोजी रखमाबाई निधन पावल्या. सदाशिवराव त्यावेळी केवळ २७ दिवसांचे होते.इ.स. १७४० मधे चुलत बंधु नानासाहेबांना पेशवाई मिळाल्यानंतर भाऊंचे सातार्याच्या दरबारात काही वर्षे वास्तव्य होते. या काळात त्यांना राजकारणाचा बराच अनुभव मिळाला. १७४६ मधील कर्नाटक मोहिम, १७४७ मधे तिथेच झालेली आजर्याची लढाई, बहादूरभेंड्याचा किल्ला जिंकणे, तुंगभद्रा किनारी जाऊन बंडखोर नवाब व देसायांना जरब बसवणे इत्यादी मोहिमा त्यांच्या नावावर होत्या. त्याचबरोबर सावनूरच्या नवाबांकडून भाऊंनी ३६ परगणे काबीज करून मराठा साम्राज्याला जोडले. १७५० मधे सांगोल्याला यमाजी शिवदेवाचे बंड मोडले. त्याच वर्षी छत्रपती राजारामांनी (दुसरे) त्यांना मराठा राज्याची कायमची मुखत्यारी दिली. तसेच नागपूरच्या भोसल्यांची दिवाणीही भाऊंना मिळाली होती. १७५० मधेच भाऊंनी कोल्हापूरमधील काही किल्ले व ५० हजार रूपयांची जहागिरी मिळवली.
हे वरील नमूद केलेले व इतर काही कामगिर्या भाऊंनी त्यांच्या आयुष्यात पार पाडल्या. भाऊसाहेबांचा स्वभाव करारी होता, शुद्ध आचरण, न्यायी व्रुत्ती, हिशेबी व्रुत्ती, दक्षता हे गुणही होते.

(मृत्यू: १४ जानेवारी १७६१)



४ ऑगस्ट इ.स.१७३३
कान्होजी आंग्रेंचे बाजीरावाला पत्र
प्रतिनिधी जोपर्यंत कोकणात आहेत तोपर्यंत काहीही होणार नाही हे सगळ्यांना कळून चुकलं होतं. खुद्द सरखेल सेखोजी आंग्रे ४ ऑगस्ट १७३३ रोजी बाजीरावांना कळवतात, “प्रतिनिधीचा विचार घालमेलीचा व शामलाचे (सिद्दी) ममतेचा पहिल्यापासून आहे तो आपणास अवगतच आहे. या कोकणच्या मानसुब्यास दोन्ही गोष्टी कार्याच्या नाहीत. आपणाजवळ (पेशव्यांजवळ) आम्ही (आंग्रे) स्वच्छंदे अथवा आपले आज्ञेने वर्तणूक करू. तैसी त्याजपासी होणे दुरापास्त. प्रतिनिधी उठोन जातील ते कळणार(ही) नाही, आपले बेत, गोद्विजांचा उच्छेद केल्याचे श्रय आपल्या पदरी पडेल.