Get Mystery Box with random crypto!

*Shiv Dinvishesh Today शिवदिनविशेष | आजचे ऐतिहासिक शिवकालीन शि | " छञपती श्री शिवाजी महाराज "

*Shiv Dinvishesh Today शिवदिनविशेष | आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष | आज दि. २५ जुलै २०२१ *

*संपूर्ण video स्वरूपात पाहा Link *





* २५ जुलै इ.स.१६४८*

महाबली शहाजी राजे कर्नाटकांत हिंदू सरदारांना आदिलशाही विरुद्ध दंड पुकारण्याची चिथावणी देत आहेत. अशी तक्रार आदिलशाही सरदार ने आदिलशहाकडे करीत. हे शहाजी महाराजांना समजल्यावर त्यांनी आदिलशाहीतील नोकरी सोडून कुतुबशाहीत जाण्याकरिता कुतुबशहा स पत्र पाठवून विचारले.तेही आदिलशहास समजले. तेव्हा त्यांना पकडण्यासाठी कामगिरी मुस्तफाखान याच्यावर सोपविण्यात आली. शहाजी महाराजांची जिंजीला छावणी होती. खानाने जिंजी येथील छावणीला वेढा घालून ते झोपेत असताना त्यांना शके १५७० श्रावण व.१ दि. २५ जुलै इ.स.१६४८ पकडले गेले. काही दिवस त्यांना कर्नाटकात ठेवल्यावर मुस्तफाखान ९ नोव्हेंबर इ.स.१६४८ रोजी मरण पावला व त्याच्या जागी आदिलशहाने अफजलखानास नेमीले.अफजलखानाने महाराजांना बंदोबस्ताने बरोबर घेऊन विजापुरास पोहचविले.