Get Mystery Box with random crypto!

*Shiv Dinvishesh Today शिवदिनविशेष | आजचे ऐतिहासिक शिवकालीन शि | " छञपती श्री शिवाजी महाराज "

*Shiv Dinvishesh Today शिवदिनविशेष | आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष | आज दि. २४ जुलै २०२१ *

*संपूर्ण video स्वरूपात पाहा Link *

https://youtube.com/shorts/ymyUC5j8YMU?feature=share


* २४ जुलै इ.स.१६७७*
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
दक्षिणेतील मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी "विल्लुपुरमचा किल्ला (जिंजी)" जिंकून संपूर्ण "विल्लुपुरम" ताब्यात घेतले.



* २४ जुलै इ.स.१६९५*
छत्रपती राजाराम महाराजांनी राज श.२० वैशाख शुद्ध नवमीला(इ.१६९४ एप्रिल २३) काढलेले एक अभयपत्र व एक आज्ञापत्र आहे. त्यांवरून असे दिसते की, तांब्राचा(मुघलांचा) ज्या ज्या वेळी पंढरपुरास त्रास होई तेव्हा विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरच्या जवळ देगावं या खेड्यात लपवून ठेवीत, पण या खेड्यास मराठा लष्कराच्या वर्दळीच्यामुळे वारंवार उपद्रव होई. तेथे मूर्ती ठेविल्या असतांना उपद्रव झाला तर देवाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बरे नव्हे म्हणून ही पत्रे आहेत. या पत्रांच्या अनुरोधाने सेनापती संताजीराव घोरपडे यांनी इ. १६९५ जुलै २४ रोजी वरील गावास कोणत्याही प्रकारे उपद्रव न देण्याबाबत आणि कोणी दिलाच तर त्याचे पारिपत्य करण्याची पागेस आज्ञा केलेली आहे.