Get Mystery Box with random crypto!

*Shiv Dinvishesh Today शिवदिनविशेष | आजचे ऐतिहासिक शिवकालीन शि | " छञपती श्री शिवाजी महाराज "

*Shiv Dinvishesh Today शिवदिनविशेष | आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष | आज दि. २२ जुलै २०२१ *

*संपूर्ण video स्वरूपात पाहा Link *





* २२ जुलै इ.स.१६७५*

*(श्रावण शुद्ध एकादशी, शके १५९७, संवत्सर राक्षस, वार गुरुवार) महाराज बहादुरखानाच्या डोळ्यात धूळ फेकण्यात यशस्वी!*

किल्ले पुरंदरला बहादुरखानाच्या वकिलांना परत पाठविले असले तरी महाराजांनी बहादुरखानाशी तहाची बोलणी सुरूच ठेवलेली होती असे दिसते. अखेरीस महाराजांनी मोगलांपासून घेतलेला मुलुख व १७ किल्ले मोगलांना परत करावेत दख्खनची सरदेसाईपणाची वृत्ती महाराजांना मिळावी, जुन्नरचा मोगली सुभेदार कल्याण-भिवंडीला यावा अशी तहाची कलमे ठरली. (युवराज शंभुराजेंचे पंच हजारी मनसबदारीचे कलम बाद झाले.) या तहावर महाराजांच्या वकिलाने बहादुरखानाची सही घेतली. बहादुरखानाने मोठ्या आनंदाने तहाचे वृत्त औरंगजेब बादशहाकडे रवाना केले. औरंगजेब बादशहा यावेळी वायव्य सरहद्दीवर होता. छत्रपती शिवाजी महाराजांशी यशस्वी तह घडवून आणल्याबद्दल औरंगजेब बादशहा बहादुरखानावर प्रसंन्न झाला. बहादुरखानाची बढती करण्यात येऊन तो आता सप्त हजारी मनसबदार झाला. औरंगजेब बादशहाने त्याला एक हत्तीही बक्षिस दिला. त्याचे भाऊ व मुले यांचाही औरंगजेब बादशहाने गौरव केला. बहादुरखानही या सन्मानामुळे खुष झाला. त्याने या निमित्ताने बहादुरगड येथे प्रचंड उत्सव साजरा केला. मेजवान्या, बैठकी यांची एकच रेलचेल उडाली. या आनंदोत्सवात बहादुरखानाने ३० हत्ती, ५०० घोडे, २००० वस्त्रे, तरवारी व अन्य शस्त्रे देणगी दाखल आपल्या सरदार, आधिकारी व सेवक वर्गाला दिल्या. परंतु हा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटला. पहिल्या पंधरवड्यात बहादुरखानाने महाराजांकडे कबूल केलेले १७ किल्ले ताब्यात देण्याबद्दल मागणी केली. परंतु महाराजांनी ते साफ नाकारून बहादुरखानाच्या तोंडाला पाने पुसली. महाराजांनी तहाची वाटाघाट, आदिलशाही मुलुखात बिनधास्तपणे स्वारी काढता यावी एवढ्यासाठीच बहादुरखानाच्या डोळ्यात धूळ फेकण्याच्या द्रुष्टीने सुरू ठेवली होती हे आता मोगलांच्या लक्षात आले. अशाप्रकारे महाराज बहादुरखानाच्या डोळ्यात धूळ फेकण्यात यशस्वी झाले.