Get Mystery Box with random crypto!

आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष १६ एप्रिल इ.स.१६६२ (व | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

१६ एप्रिल इ.स.१६६२
(वैशाख शुद्ध नवमी, शके १५८४, संवत्सर शुभकृत, वार बुधवार)

शाहिस्तेखानाचा तळ होळ या गावी निरा नदीकाठी पडला. शाहिस्तेखानाने इंदापुर सोडले. व निरा नदीच्याकाठी अगदी प्रसन्न वातावरण पाहून होळ या गावी श्रमपरिहारासाठी काही दीवस तळ टाकला.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




१६ एप्रिल इ.स.१६७३
(वैशाख शुद्ध दशमी, शके १५९५, संवत्सर प्रमादी, वार बुधवार)

सरसेनापती प्रतापराव गुजर यांची हुबळीवर स्वारी !
सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी अत्यंत आक्रमकपणे इंग्रजांची हुबळीची वखार लुटली. आणि सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी यावेळी इंग्रजांची वखार नुसती लुटली नाही तर पुरुषभर खोल खड्डा करून खणत्या लाऊन लुटली. या लुटीत इंग्रजांचे आतोनात नुकसान झाले. इंग्रजी रेकॉर्डनुसार ७८९४ होनांचे केवळ नुकसानच झाले नाही तर लुटीच्या धामधुमीत मराठी सैन्याच्या इंग्रजांच्या स्फोटक दारुसाठ्याला आग लागून प्रचंड भडका उडाला.



१६ एप्रिल इ.स.१६८३
दि ६ एप्रिल १६८३ रोजी मराठ्यांचा तळ कल्याण-भिवंडीपासून चौदा मैलांवर असताना रुहल्लाखानाचा मुलगा सैफुल्ला खान मराठ्यांवर धावून चढाई करण्यास आला. दोन्ही सैन्यात लढाई झाली. ह्या आक्रमणापुढे मराठ्यांचा निभाव लागला नाही. ह्या सुमारास संभाजी महाराजांनी कल्याण-भिवंडी परिसरात मोगल सैन्यास प्रतिकार अत्यंत तीव्र केला होता. तेव्हा दिनांक १९ मार्च ते १६ एप्रिलच्या दरम्यान मोगल सेनानी रोहिला खान कोकणात (कल्याणजवळच्या पौंड खोऱ्यात) उतरून गेला व रणमस्तखान घाटावर येऊन गेला. रुपाजी भोसले याने टिटवाळ्याजवळ (कल्याणच्या ईशान्येस ४ १/२ मैल) त्यांच्याशी लढाई केली. तेव्हा घनघोर रणसंग्रामात मराठ्यांनी मोगलांचे कित्येक सेनाधिकारी ठार केले. कल्याण-भिवंडी येथे झालेल्या लढायात संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मोगलांच्या ताब्यातील प्रदेश उजाड केला होता. मराठ्यांनी सातत्याने येणाऱ्या मोगल सेनानीचा अत्यंत तीव्र प्रतिकार केला. त्यामुळे मदतीकरता इंग्रजांना पाचारण करणे मोगलांस अपरिहार्य झाले. ऑगस्ट, १६८३ पर्यंत मोठी फौज धाडून आणि कित्येक मातब्बर सेनानी योजूनही मोगलांना कल्याण-भिवंडी परिसरात परिणामकारक प्रगती करता आली नाही.



१६ एप्रिल इ.स.१६९९
१६९९ मध्ये मराठ्यांची आक्रमणे औरंगाबाद, वहाड आणि खानदेश या सुभ्यातून मोठ्या प्रमाणांवर चालू झाली. औरंगजेबास १६ एप्रिल १६९९ रोजी हरकाऱ्याच्या तोंडून कळले की कृष्णा सावंत हे मोठे मराठी सैन्य घेऊन वहाड प्रांतांत हालचाल करीत होता. औरंगजेबास हेरांनी कळविले की जालन्याजवळ मराठे सरदारांनी चार हजार सैन्यांसह बादशाही मुलूख लुटला.





१६ एप्रिल इ.स.१७७५
आनंदीबाईसाठी फितूरी करणाऱ्या येसाजी विश्वासराव आणि रामचंद्र सावंत यांना अशेरीगडच्या किल्लेदाराने मारून टाकले.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.