Get Mystery Box with random crypto!

आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष १५ एप्रिल इ.स.१६४५ (च | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

१५ एप्रिल इ.स.१६४५
(चैत्र वद्य चतुर्दशी, शके १५६७, संवत्सर पार्थिव, वार मंगळवार)

स्वराज्याची शपथ!
लहानपणापासून माँसाहेब जिजाऊंसाहेबांच्या तोंडून श्रीरामांच्या, धणुर्धारी अर्जुनाच्या, त्यांच्या पराक्रमाच्या गाथा ऐकत महाराज वयाच्या १५, पंधराव्या वर्षात आले. महाराजांच्या जीवनातला हा अत्यंत महत्वपूर्ण असा काळ मनात हिंदवी स्वराज्य स्थापनेचा संकल्प आकारास येण्याचा हा अनुकूल काळ होता. १२ मावळचे अनेक सवंगडी ज्यात तानाजी मालुसरे, सुर्याजी मालुसरे, बाजी पासलकर, चिमणाजी व बाळाजी मुदगल देशपांडे, येसाजी कंक, कोंडाजी कंक, भिकाजी चोर, बाजी जेधे, सुर्यराव काकडे, त्र्यंबक सोनदेव, "दादाजी नरसप्रभु देशपांडे ही नव्या दमाची, तरुण तडफदार मंडळी यवनांच्या अन्यायी आक्रमणाविरुद्ध महाराजांचा शब्द झेलायला तयार होती, आणि हाच संकल्प महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, त्यांच्या सवंगड्यांनी शंभुमहादेवाच्या साक्षीने रोहिडेश्वराच्या मंदिरात सोडला. भोर तालुक्यातील रोहिडा खोऱ्यातील रायरेश्वर हे सह्याद्रीच्या शिखरावरील गच्च झाडीत असलेल्या ठिकाणी रक्ताचा अभिषेक घालून, सर्व सवंगड्यांचे इमान "श्री" पाशी झाले. हिंदवी स्वराज्य संकल्पनेचा नाद इथेच गुंजला. आदिलशाहीच्या अन्यायाविरुद्धच्या संघर्षास जणू एक अधिष्ठान प्राप्त झाले. ही शपथक्रिया रायरेश्वराच्या मंदिरात शंभुमहादेवाच्या साक्षीने करंगळी कापून मावळ्यांच्या बरोबर रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेचा संकल्प सोडला गेला.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link
https://youtube.com/shorts/YRf4Ej_jRRs?feature=share

१५ एप्रिल इ.स.१६५७
छत्रपती शिवाजी महाराज इंगळे घराण्यातील गुणवंताबाईसाहेब यांच्याशी विवाह संपन्न.



१५ एप्रिल इ.स.१६७३
पन्हाळा किल्ला मराठ्यांनी काबीज केल्याची बातमी विजापूर दरबारांत धडकल्यावर तेथे खळबळ उडाली. सर्व सरदारांनी विचार करून आपला नामांकित सेनानी बहलोलखान याच्या नेतृत्वाखाली राजांवर सैन्य पाठविले. विजापूर दरबाराचा हा अफझलखानसारखा अतिशय बडा सरदार होता, त्याचे नाव अब्दुल करीम बहलोलखान, हा मूळचा अफगाणिस्थानातील जवान. जातीचा पठाण. तो विजापूर दरबारी आल्यावर त्यास दरबारने मिरज व पन्हाळा सुभ्याचा सुभेदार नेमले होते. खुद्द त्याच्या सुभ्यापैकी महाराजांनी पन्हाळा किल्ला घेतल्यामुळे तो चिडला होता. बहलोलखान विजापुराहून निघून तिकोट्यावरून उंब्राणीवर येऊन पोचला. त्यास रांगणा अद्वानी, कार्नोल आदी ठिकाणाहून आणखी सैन्य येऊन मिळावे म्हणून विजापूर दरबारने हुकूम काढले. शिवाय त्याने मोगल सरदार दिलेरखान याच्याकडेही फौजेची मागणी केली. हे राजांना कळले तेव्हा बहलोलखानास दुसरी सैन्ये येऊन मिळण्यापूर्वीच त्यांच्यावर आपण हल्ला करावा म्हणून राजियांनी प्रतापराव व आनंदराव यांची त्याजवर रवानगी केली. दोनच दिवसांत प्रतापराव उंब्रणीजवळ बहलोलखानाच्या तळाशी आले. उमराणीच्या तलावाचे पाणी बंद करण्याचे हुकूम दिले. पाणी बंद
झाल्याचे समजल्यावर खानाच्या तोंडचे पाणी पळाले, तेव्हा खानाने युद्धास सुरवात केली, तीन तास घनघोर युद्ध चालले. मुंडक्यांचा खच पडला. प्रतापरावांस शरण जाण्याशिवाय खानाकडे दुसरा उपाय नव्हता. खानाने आपला वकील प्रतापरावाकडे पाठविला, शरणागती पत्करली आणि पुन्हा मराठ्यांच्या वाटेस जाणार नाही असे कबूल केल्यामुळे प्रतापरावाने त्यास जाऊ दिले. मराठ्यांच्यापुढे मानाखाली घालून पठाणांची सेना निघून गेली. (दिनांक १५ एप्रिल १६७३) महाराज यावेळी रायगडावर होते. प्रतापरावांनी खानाला शरण आणले, एक खासा हत्ती काबीज केला हे ऐकून शिवराय आनंदले. पण प्रतापरावाने बहलोलखानास सोडून दिल्याचे समजतांच छत्रपती शिवाजीराजे भयंकर रागावले. त्यांनी रावांना लिहिले, “खानाशी सल्ला काय निमित्त केला?"



१५ एप्रिल इ.स.१६८०
महाराजांच्या मृत्युनंतर छत्रपती शंभूराजांनी राजापूर, कुडाळकडील ‘कामावीसदारास’ पत्रे धन घेऊन पन्हाळ्यावर बोलावले तसेच कारवारच्या बंदरात धान्य होते ते त्यांनी आपणाकडे आणले.



१५ एप्रिल इ.स.१६८३
छत्रपती संभाजी राजांनी स्वत: १००० घोडदळ व २००० पायदळ घेऊन ‘तारापूर’ वर हल्ला केला आणि ते शहर जाळले. याशिवाय मराठ्यांनी दमण पासून वसई पर्यंत असलेल्या डहाणू, आसेरीम, सैबाना आणि इतर काही गावावर हल्ले केले. त्यांनी काही गावे लुटली, काही जाळली, होड्या व पाडाव हस्तगत केले आणि २ पोर्तुगीज पाद्री कैद केले.


https://youtube.com/shorts/YRf4Ej_jRRs?feature=share
१५ एप्रिल इ.स.१७३९
वसई किल्ल्यावरील मराठ्यांच्या हल्यामध्ये पोर्तुगीज ऑफीसर पिंटो आणि सिलवेरा यांचा मृत्यू.